“यह वादा रहा”या करावके सिंगिग शो मध्ये सिंगर शर्मिला केसरकर यांच्या सुरेल आवाजाने रसिक मंत्रमुग्ध,तसेच आयोजकांकडुन सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार ————————————————————अंबरनाथ(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-अंबरनाथकर संगीतप्रेमींसाठी मोहन पुरम काॅप्लेक्स,कानसाई सेक्शन,मोहन पुरम कम्युनिटी हाॅल,अंबरनाथ(पुर्व)येथे”यह वादा रहा”हा करावके सिंगिग शो नुकताच आयोजित केला होता.या संगितमय कार्यक्रमात जेष्ठ गायिका शर्मिला केसरकर यांनी आपल्या सुमधूर आवाजात गाणी पेश करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.तसेच यावेळी आयोजकांनी सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,कल्याण-कसारा-कर्जत महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला संघटक सौ.रेखा अत्तरदे,गायिका शर्मिला केसरकर तसेच इतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.तसेच गेस्ट सिंगर शर्मिला केसरकर यांनीही आयोजकांचाही भेटवस्तू देऊन सत्कार केला.शेवटी सिंगर इंद्रनिल यांनी सर्वांचे आभार मानले.
“यह वादा रहा”या करावके सिंगिग शो मध्ये सिंगर शर्मिला केसरकर यांच्या सुरेल आवाजाने रसिक मंत्रमुग्ध,तसेच आयोजकांकडुन सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
