पुरवठा विभागाने रेशन दुकानदार यांना पुरवलेल्या नवीन मशीन मुळे होत आहे नागरिकांची गैरसोय

पुरवठा विभागाने रेशन दुकानदार यांना पुरवलेल्या नवीन मशीन मुळे होत आहे नागरिकांची गैरसोय शहादा येथील अन्न पुरवठा विभागाने नवीन अपडेट मशीन रेशन दुकानदार यांना पुरवले आहेत, पण या नवीन मशीन मुळे नागरिकांना सतत रेशन दुकान वर चकरा मारावे लागत आहेत , सतत सर्वर डाऊन असल्या कारणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, नागरिकांचे म्हणणे आहे की जुने मशीन च चांगले होते , त्याच्यावर बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे काम होत होते , तर शासनाने या नवीन मशीन देऊन नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत ,म्हणून काम सोडून दिवस दिवस भर रेशन दुकान वर रेशन कार्ड घेऊन बसावे लागत आहे , याला जबाबदार कोण हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे , पुरवठा विभागाने यावर काही तोडगा काढावा अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे .आता यावर पुरवठा विभाग काय पाऊल उचलत याकडे जनतेचे लक्ष आहे. क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!