सर्वरमुळे रेशनचे वाटप करण्यास अडचण निर्माण होत होती मात्र आता ऑफलाइन अन्नधान्य वाटपास मान्यता देण्यात आली आहे.

नाशिक : सर्वर मध्ये झालेल्या समस्येमुळे राज्यातील अनेक नागरिक रेशनच्या धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्यातील अनेक भागांमधून नागरिकांनी याबाबत तक्रारी दिल्या होत्या त्याचबरोबर अन्नधान्य वितरण करणाऱ्या दुकानदारांनीही याबाबतीत तक्रारी या मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केल्या होत्या त्यानुसार विभागाने बैठक घेऊन यावर तात्काळ उपायोजना कराव्यात अशा सूचना देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या त्यानुसार केंद्र सरकारची चर्चा करून ऑफलाइन अन्नधान्य वितरण करण्यास आज परवानगी देण्यात आली आहे.गेल्या आठ दिवसांपासून सर्वरमुळे रेशनचे वाटप करण्यास अडचण निर्माण होत होती मात्र आता ऑफलाइन अन्नधान्य वाटपास मान्यता देण्यात आली आहे. . याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आल असून या निर्णयामुळे राज्यभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!