*ब्राह्मणपुरी ता शहादा येथे माझी वसुंधरा 5.0 अभियान* शहादा :तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत माझी वसुंधरा अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेऊन गावात रॅली काढण्यात आली शासन परिपत्रकानुसार गाव पातळीवर माझी वसुंधरा अभियान 5 .0 राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असून ब्राह्मणपुरी ता शहादा येथे जि प शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण व प्रभात फेरी काढून माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले . यावेळी प्रभात फेरीमध्ये जल , जंगल संवर्धन व वायू प्रदूषण थांबविणे यावर घोषणा, भित्तिपत्रके तयार करून जनजागृती करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे पृथ्वीतलावरील दुष्परिणामांचे घोषवाक्यांच्याद्वारे जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी संतराम राठोड मुख्याध्यापक, उपशिक्षक शिवाजी पाडवी, शहनाज पटेल, जगदीश वसावे व शाळा व्यवस्थापन समिती यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व अंमलबजावणीसाठी केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे गटशिक्षणाधिकारी डॉक्टर योगेश सावळे यांनी मार्गदर्शन केले.
Related Posts
शहादा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा 75 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला
शहादा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा 75 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. —- शहादा–३–शहादा येथील शहादा महामंडळाच्या बस स्थानकात…
कायद्याचे मूळ स्वरूप समजणे आवश्यक – श्री अविनाश मोकाशी
कायद्याचे मूळ स्वरूप समजणे आवश्यक – श्री अविनाश मोकाशी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित नसरापूर शंकरराव भेलके महाविद्यालयामध्ये रॅगिंग विरोधी…
शहादा शहरात बेकायदाशीर धंदे बंद करा संविधान आर्मी चा इशारा अन्यथा मोठ आंदोलन करण्यात येईल
शहादा शहरात बेकायदाशीर धंदे बंद करा संविधान आर्मी चा इशारा अन्यथा मोठ आंदोलन करण्यात येईल काल दि.10/03/2023 शुक्रवार रोजी शहादा…