*दोडाईंचा पोलिसांचा मास्टर स्ट्रोक शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारी सराईत टोळी गजाआड दोन आरोपी फरार*1,91,500 रू.इलेक्ट्रीक मोटार पंप व मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त
दोडाईंचा : गेल्या अनेक दिवसांपासून दोडाईंचा व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरी जाण्याचे प्रकार वाढले होते. दि.2 अॉगस्ट 2024 रोजी बाम्हणे ता. शिंदखेडा येथून तक्रारदार हर्षल संजय पाटील या तरुण शेतकऱ्यांने दोडाईंचा पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली की त्याचा शेतीतील 5 हॉर्स पावरची इलेक्ट्रीक मोटार चोरी गेल्याची त्या अनुषंगाने दोडाईंचा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल केला होता.चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी विरिष्ठांचा सुचनेनुसार नुतन पोलीस निरीक्षक किशोर परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. याच दरम्यान दोडाईंचा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की बाम्हणे गावात दिपक शिवाजी पाटील नामक इसम गावातील लोकांना कमी किमतीत शेतातील इलेक्ट्रीक मोटार देण्याचे अमिष दाखवत आहे. सदरील इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्यांचा साथीदारांनसोबत मिळून गुन्ह्याची कबुली देत त्याचासह अनिल ( दादू पाटील ) सुनील भील रा.बाम्हणे तन्वीर करीम खाटीक रा. गरिब नवाज कॉलनी दोडाईंचा या सर्व आरोपींनी बाम्हणे , लंघाणे , धमाणे कुरूकवाडे अशा गावातील शेतकऱ्यांचा मोटरी चोरींची कबुली दिली. त्यांचाकडून एक हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल ,3 व 5 हॉर्स पावरच्या 8 मोटरी जप्त करण्यात आल्या. सदरील गुन्ह्यात दोन आरोपींना अटक केली असुन दादु पाटील व सुनील भिल हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. सदरील कार्यवाही हि धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धिवरे अप्पर पो.अधिक्षक किशोर काळे , उपविभागीय पो.नी. भागवत सोनवणे दोडाईंचा पो.स्टे.पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोडाईंचा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ , उपनिरीक्षक हेंमत राउत , नकुल कुमावत पोलीस अंमलदार सुनील महाजन , राजन दुसाने , प्रविण निंबाळे , पुरूषोत्तम पवार , हिरालाल सुर्यवंशी, अक्षय शिंदे अनिल धनगर यांनी केलेली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ हे करीत आहे.दोडाईंचा पोलीस स्टेशन हे चोरींचा घटनेत नेहमी उदासीनता दाखवते असा समज दोडाईंचेतील नागरिकांनमधे आहे परंतू या कार्यवाही ने ग्रामीण भागातील शेतकरी व दोडाईंचेतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.आण्णा कोळी महादेवपुरा दोडाईंचा