*तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव शहादा येथे संपन्न* महाराष्ट्र शासन कृषी विभाग व प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार अंतर्गत 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान ” रानभाज्या महोत्सव ” हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. प्रकल्प संचालक आत्मा दिपक पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शहादा येथे आज रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अभिजीत पाटील सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा यांनी अध्यक्षस्थान भूषवले व सभापती पंचायत समिती वीरसिंग ठाकरे , उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . मंडळ कृषी अधिकारी एस. बी .बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी के.एस.वसावे कृषी महाविद्यालयाचे प्रा. पंकज पेंढारकर सर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. पंकज पेंढारकर सर यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्व व औषधी गुणधर्माबाबत माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांनी आदिवासी बांधवांनी रानभाज्यांच्या उत्पादनात वाढ करणे आणि आपला पारंपारिक व्यवसाय टिकून ठेवण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. तालुका कृषी अधिकारी के .एस.वसावे यांनी शहरी भागातील लोकांना रानभाजी प्रचार व प्रसार व्हावा याबाबत रानभाजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे असे सांगितले. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अभिजीत पाटील यांनी रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून विविध रानभाज्याचे माहिती शहरातील लोकांना ओळख झाली असून या रानभाज्यांचे शेतकरी बांधवांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हक्काचे दालन उपलब्ध करून देईल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात तालुक्यातील शेतकऱ्यांनी व कुंडमाऊली शेतकरी गट पिप्राणी यांनी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या रानभाजी प्रदर्शनात मांडल्या होत्या. त्यात प्रामुख्याने आर्वी कंद ,फाग , चिरीची /मोखा भाजी,राजगिरा,कंटुरले अंबाडीचे पाने,पोकळा,आदी वनभाज्या प्रदर्शनाला होत्या.कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. दिपाली गवळे यांनी केले.आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रविंद्र बच्छाव यांनी आभार मानले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी मनोज खैरनार, सचिन साळवे, जाकीर शेख कृषी पर्यवेक्षका बी.आर.पावरा ,कृषी पर्यवेक्षक विजय माळी,भरत करंजे,अशोक महिरे,मनोहर सैदाणे,एकनाथ साळवे, चंद्रशेखर माळी व सर्व कृषी सहायक यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव शहादा येथे संपन्न
