महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संयुक्त संघटना संघर्ष समिती*भगिनींनो, सर्व अंगणवाडी कर्मचारी सभासदांना सुचित करण्यात येते की, संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांनी महिला व बाल विकास मंत्री मा. आदिती ताई तटकरे यांची भेट घेतली. प्रसंगी मानधन वाढ, पेन्शन, ग्रॅज्युटी या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच मंत्री महोदयांना लाडकी बहिण योजनेतील कामात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाबाबत माहिती दिली व चर्चा केली. मा. मंत्री महोदयांनी मानधन वाढ देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. पेन्शनचा प्रस्ताव तयार आहे व राज्यशासनाच्या मंजुरी साठी पाठविण्यात आला आहे, ग्रॅज्युटी चा प्रस्ताव केंद्र शासनकडे पाठविण्यात आला आहे. असे सांगितले. माझी लाडकी बहिण योजनेमध्ये कोणत्याही मानसेवी कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्यात आली नव्हती, आमच्या प्रयत्नाने सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या योजनेत सहभागी केले गेले आणि त्यांना खात्यावर रक्कम देखील मिळण्यास सुरुवात झाली आहे. असे मा. मंत्री महोदयांनी सांगितले. संघटने मार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ, ग्रॅज्युटी आणि पेन्शन मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परिणामी आगामी काळात मोर्चा आणि इतर आंदोलनाबाबत संघटनेची भूमिका आपल्याला कळविली जाईल. *लढेंगे जीतेंगे….* *हमारी युनियन..* *हमारी ताकत…* श्रीमती. माया परमेश्वर, श्री. अरुण गाडे, श्री. संजय मापले., श्रीमती. शुभांगी पालशेतकर, श्री. युवराज बैसाने, श्री. रामकृष्ण पाटील, श्रीमती. चंदा नवले, श्री. यशवंत माटे, श्री. दत्ता जगताप, श्री. सुधीर परमेश्वर, श्री. अमोल बैसाने सर्व संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते…
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संयुक्त संघटना संघर्ष समिती तर्फे विविध विषयावर चर्चा करण्यात आली
