जिल्हा प्रतिनिधी = नरेश शिंदे
*लाडक्या बहिणींचे फॉर्म मंजुरीचे श्रेय कोणीही घेऊ नये;जनता सुजान आहे**माजी आ.चंद्रकांत रघुवंशींची मंत्री गावितांवर टीका*नंदुरबार (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे महिला भगिनींचे आमदार कार्यालयातून हजारोंवर फॉर्म भरून घेण्यात आलेले आहेत.दुर्दैवाने आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे लाडक्या बहिणींचे फॉर्म आम्हीच भरून ते मंजूर केले अशी वल्गना करीत आहेत.त्यांनी एका भगिनींच्या देखील फॉर्म भरलेला नसून, फुकटचे श्रेय घेण्याच्या प्रयत्न ते करीत असल्याचे आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी शनिमांडळ व रजाळे येथील कार्यक्रमात जे आमदार नाहीत ते सुद्धा लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून मंजूर करून आणले असा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर केला होता. त्यावर रघुवंशी यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, शासनाच्या संजय निराधार, श्रावण बाळ योजनेसह अनेक योजना त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी आमदार कार्यालयात सेतू सुविधा केंद्र चालविण्यात येत आहे. दुर्दैवाने मंत्री गावित लाडक्या बहिणींचे फॉर्म आम्हीच भरून ते मंजूर केले अशी वल्गना करीत आहेत. खरं म्हणजे स्थानिक स्तरावर योजना मंजुरीसाठी 3 जणांची कमिटी आहे. त्यात प्रस्तावना नामंजूर करण्याचे अधिकार कोणालाही नाहीत. योजनेपासून कोणतीही महिला भगिनी वंचित राहू नये असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धोरणच आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित योजनेचे फॉर्म आम्हीच मंजूर केल्याची खोटी वल्गना करीत आहेत. त्यांनी एका भगिनींच्या देखील फॉर्म भरलेला नाही. फुकट श्रेय घेण्याच्या प्रयत्न ते करीत आहेत. जनता सुजन आहे. कोणत्या कार्यालयातून किती फॉर्म भरून घेण्यात आलेली आहेत हे जनतेला चांगलंच माहिती आहे.