*स्वो. वि. संस्थेचे, दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मालपुर येथे विद्यार्थ्यांचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला*मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी मालपुर ,शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे स्वो. वि. संस्थेचे, दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी सर्व विद्यार्थिनींनी आपल्या भावांना आपले रक्षण करण्यासाठी रक्षा सूत्र, राख्या बांधल्या. मुलांनीही आपल्या बहिणींचा नमस्कार करून त्यांचे रक्षण करण्याचे वचन दिले. तसेच सर्व शिक्षक बंधूंना शिक्षक भगिनींनी रक्षा सूत्र राख्या बांधून एकोप्याने राहण्याचे व रक्षण करण्याचे वचन दिले.वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन. पाटील सर, पर्यवेक्षिका भाग्यश्री भावे मॅडम, ग्रंथपाल प्रमोद भाऊसाहेब, तसेच काटे सर, श्याम भावसार सर, डी.आर.ठाकरे सर, पवन निकम सर,नगरदेवळेकर सर, माळी सर, चव्हाण सर ,शेख सर,जागृती जाधव , रेखा ढोले तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
Related Posts
व्हालंटरी प्राथमिक महिला मंडळ शाळा, कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व्हाॅलंटरी माध्यमीक विद्यालय व्हाॅलंटरी इंग्लिश मिडीयम स्कूल शहादा विद्यामंदिरात अवतरले बाल वारकरी
व्हालंटरी प्राथमिक महिला मंडळ शाळा, कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व्हाॅलंटरी माध्यमीक विद्यालय व्हाॅलंटरी इंग्लिश मिडीयम स्कूल शहादा विद्यामंदिरात अवतरले…
मांगल्य संस्था ने किया शहर में जगह जगह पर वृक्षारोपण*
*मांगल्य संस्था ने किया शहर में जगह जगह पर वृक्षारोपण* पर्यावरण का संतुलन बनाए रखने के लिए वृक्षों को बचाना…
आदर्श शिक्षकाचा गावाकडून सन्मान
*आदर्श शिक्षकाचा गावाकडून सन्मान* शहादा तालुक्यातील चिखली दिगर ग्रामस्थांनी नवीन पायंडा पाडून शैक्षणिक वातावरणात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.…