*संत श्री आशारामजी गुरुकुल धुळे गोमय रक्षासूत्र ने रक्षाबंधन साजरे*महाराष्ट्र राज्य महा.एनजीओ फेडरेशन व मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन निमित्त संत श्री आशारामजी गुरुकुल धुळे येथे गोमय रक्षासूत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात शाळेतील मुलींनी गाईच्या शेणापासून बनविलेल्या पर्यावरण पूरक राख्या शाळेतील मुलांना बांधल्या यावेळी गो शाळेतील गाईच्या शेणापासून बनविलेल्या राख्या महा.एनजीओ फेडरेशन यांच्या कडून मिळाल्या असून सदर राख्या ह्या पर्यावरण पूरक आहेत त्यामुळे प्रदूषण टाळून पर्यावरण संवर्धन होईल असे मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे घ्या सचिव सौ.आशा आखाडे ,संस्थेचे अध्यक्ष डॉ .डी.एम.आखाडे यांनी सांगितले सदर कार्यक्रम प्रसंगी मा.कमलेश सर मा.भाईजी, दर्शना दिदि , तसेच मराठी माध्यम व इंग्लीश मेडीयमचे शिक्षक व मुख्याध्यापक सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
संत श्री आशारामजी गुरुकुल धुळे गोमय रक्षासूत्र ने रक्षाबंधन साजरे
