शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पाडळदे बु ता.शहादा जि.नंदुरबार , महाराष्ट्र राज्य व महा एनजीओ फेडरेशन यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गोमय रक्षासुत्र रक्षाबंधनाचा कार्यक्रम महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी यासाठी विशेष समन्वय साधला. प्रत्येकाच्या घरात एक देशी गोमाता अपेक्षित आहे की ज्याने अध्यात्मिक व आरोग्याच्याबाबतीत महत्वपूर्ण योगदान दिले जाऊ शकते. गाईचे दुधाशिवाय देखील अन्य गोष्टीमधून आपण आर्थिक साक्षर होऊ शकतो. याचेच उदाहरण म्हणून राखीची निर्मिती आहे. गो आधारित अर्थ व्यवस्था, देशी गाईंचे संगोपन, संवर्धन व संरक्षण व अर्थव्यवस्था या रचनेवर यंदाची मांडणी फेडरेशनने केली आहे. गोशाळा व गोप्रेमीना यातून रोजगार उपलब्ध होऊ शकला. तसेच महा एनजीओ फेडरेशन सोबत संलग्न असणाऱ्या नंदूरबार जिल्ह्यातील शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पाडळदे ब्रु !! ता. शाहदा जि.नंदुरबार या संस्थेने हा उपक्रम शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सुलतानपूर , ता.शहादा, जि.नंदुरबार येथे गोमय बीज रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना गोमय बीज राख्या बांधण्यात आल्या. सदर गोमय बीज रक्षाबंधन कार्यक्रमास उपस्थित अध्यक्षस्थानी डॉ. किशोर पाटील, प्रमुख पाहुणे राजेंद्र पाटील म्हणून उपस्थित होते.उपस्थित संस्थेचे पदाधिकारी – जयेश पाटील, सचिन भाऊ पावरा, पंकज अहिरे, प्रदीप पाटील, रामदास पावरा , आनंदसिंग शेवाळे, आदित्य ढोढवे , एडवोकेट जयपाल सिंग गिरासे , हंसराज पाटील, प्रियांक पाटील, कमल पावरा,विक्की अहिरे, दशरथ घोडराज , राजेश्वरी महीरे, मिनाक्षी पाटील व श्री. एन. के. दुसाने मुख्याध्यापक श्री. प्रवीण पाटील श्री. डी बी पाटील श्री. के बी बोडखे श्री. व्ही. के पटले.श्री. पी. जी. पावराश्री. ए. पी. ह्याळिज श्री. के. बी. सुर्यवंशीश्री. एन. एम. पाटील.अधीक्षकश्रीमती एस. डी. फोलाने अधिक्षीका व वर्ग चार कर्मचारी उपस्थित होते
शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पाडळदे बु ता.शहादा जि.नंदुरबार , महाराष्ट्र राज्य व महा एनजीओ फेडरेशन यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गोमय रक्षासुत्र रक्षाबंधनाचा कार्यक्रम
