दारुबंदी निवडणूक प्रक्रिया न झाल्यास असलोद ग्रामपंचायत व गावकऱ्यांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार १६ ऑगस्ट ग्रामसभेत ठराव मजुर

*दारुबंदी निवडणूक प्रक्रिया न झाल्यास असलोद ग्रामपंचायत व गावकऱ्यांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार १६ ऑगस्ट ग्रामसभेत ठराव मजुर*

जिल्हा प्रतिनिधी:- नरेश शिंदे

शहादा तालुक्यातील असलोद ग्रामपंचायत व गावकरी सन २०११पासुन दारुबंदी साठी सर्घष करित आहे परंतु शासकीय प्रतिनिधी ग्रामविस्तार अधिकारी,तहसीलदार, जिल्हा अधिकारी व उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार व शहादा असलोद पोलिस स्टेशन यांनी सरास दारुबंदी ठरावाची पायमल्ली करीत असल्याने दिनांक १६/०८/२०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव क्रमांक एक मधे विषय क्रमांक आठ मधे विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सभेत बहुमताने पारित करण्यात आला त्यात सभा अध्यक्ष विलास पवार व ग्रामविकास अधिकारी मुकेश पावरा सभेत हजर गावकऱ्यांनी मंजुर केलाअसलोद ग्रामपंचायत व गावकरी गेल्या अनेक वर्षांपासून गावात दारुबंदी व्हावी यासाठी संघर्ष करीत आहे ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी सन २०१२ पासुन ते आज पर्यंत कोणालाही बीयर बार व दारु विक्री साठी परवानगी दिली नाही तरी देखील असलोद ओपी पासुन ते मदाणा शिव पर्यंत अवैध कच्चे व पक्के ढाबे चालतात कसे असा प्रश्न ग्रामपंचायतीला व गावकऱ्यांना पडला आहे हे सर्वं कच्चे व पक्के ढाबे बंद करण्यासाठी आता संभाजी नगर येथील मानव अधिकार संघटनेच्या सचीवाने देखील दखल घेतली आहे त्यामुळे आता असलोद गावात दारूबंदी करण्या शिवाय पर्याय उरलेला नाही तहसीलदार, जिल्हा अधिकारी, उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार यांनी सरास दारुबंदी ठरावाची पायमल्ली केल्याने आता असलोद ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन उभे केल्याने तहसीलदार, उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार यांना दारुबंदी साठी जिल्हा अधिकारी यांनी निवडणूक घेण्याचे जे आदेश दिले आहेत त्यांचे पालन करणे भाग आहे उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार यांनी निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत हे कारण देत आज पर्यंत निवडणूक घेतली नाही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी आता लागणारा जेवढा खर्च आहे जो लागेल तो खर्च ग्रामपंचायत देण्यासाठी तयार असल्याने निवडणूक प्रक्रिया पार पाडने हे शासनासाठी अत्यावश्यक आहे.*झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी केलेलीं कार्यवाही*दारूबंदी साठी सन २०११ पासुन ते सन २०२४ ग्रामपंचायत ग्रामसभेच्या दारुबंदी ठरावाची प्रती असलोद पोलीस स्टेशन,शहादा पोलिस स्टेशन, नंदुरबार पोलिस निरीक्षक व नाशिक पोलिस महासंचालक दिघावकर साहेब तसेच ग्रामविस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार साहेब, प्रांताधिकारी, जिल्हा अधिकारी, उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार व शहादा यांना पाठविण्यात आल्या तरी देखील एकही शासकीय अधिकारी यांनी आज पर्यंत असलोद गावात दारूबंदी व्हायला पाहिजे यासाठी आपला प्रमाणीक पणा व कर्तव्ये पार पाडलेले दिसत शासनाच्या शासकीय अधिकारी यांच्या कडुन न्याय मिळत नसल्याने गावकरी व ग्रामपंचायत एवढ्या वर न थांबता उत्पादन शुल्क विभाग नाशिक, उत्पादन शुल्क विभाग मुंबई, व जनसंपर्क अधिकारी गृहमंत्रालय महाराष्ट्र राज्य,गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देखील पोस्टाने दारुबंदी ठरावाच्या प्रती पाठवल्या तरी देखील झोपलेल्या शासनाने व विसपडलेल्या अधिकाऱ्यांनी आज पर्यंत सर्व असलोद ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी केलेल्या दारुबंदी ठरावांना व अर्जाना केराची टोपली दाखवली आता असलोद गावातील तरुण तडफदार युवकांनी दारुबंदी साठी व्रज मुठ बांधली असुन ग्रामपंचायत व गावकरी राजु वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली दारुबंदीचा लढा पुन्हा उभा केला आहे*जिल्हा अधिकारी नंदुरबार यांनी दारुबंदी निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी दिले होते आदेश*उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली असलोद गावात महीला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले त्यात सर्व प्रक्रिया पार पडली एवढेच नाही तर पेसा कायदा अंतर्गत देखील दारुबंदी साठी उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार यांनी प्रक्रिया पार पाडली सर्व जाब जबाब घेतले त्यांनंतर जिल्हा अधिकारी यांनी असलोद ग्रामपंचायत मार्फत उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार व तहसीलदार शहादा यांना निवडणूक घेण्याचे दिले होते परंतु तहसीलदार शहदा यांनी उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार यांच्या कडे निवडणुक प्रक्रिया राबविण्यासाठी तिस हजार खर्च लागणार होता तो उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार यांनी उपलब्ध न करुन दिल्याने पत्रव्यवहार थांबविल्यने असलोद ग्रामपंचायतीचा व गावकरीचा दारुबदीचा मुद्दा तसाच पडुन राहिला आहे *दारुबंदी ठरावाची अंमलबजावणी व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घेतले आठ ठराव*असलोद गावातील जगन झिपरु शिरसाट, विरेंद्र आबा सनेर, संजीव साहेबराव वानखेडे यांनी ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना दारुबंदी व्हावी यासाठी ग्रामपंचायतीने एकुण आठ मुद्यांवर कार्यवाही करावी यासाठी अर्ज दिला त्यांवर ग्रामपंचायत असलोद यांनी दिनांक १६/०८/२०२४ रोजी शिवाजी चौकात ग्रामसभा घेण्यात आली त्यात दारुबंदी व्हावी यासाठी दोन अर्ज होते ते दोघी अर्ज ग्रामसभेत अतिमत्वाचे विषय असल्याने चर्चेला घेतले त्यात ग्रामसभेत उपस्थित ९५% लोकांनी सकारात्मक बाजु दारुबंदी गावात होणे गरजेचे असल्याने होकार दिला व बहुमताने सर्व पारीत करण्यात आले त्यात १) जिल्हा अधिकारी यांनी निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत त्या विषयावर ग्रामविस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी,तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हा अधिकारी व उत्पादन शुल्क विभाग शहादा, नंदुरबार, यांना दारुबंदी साठी निवडणूक तात्काळ निवडुक लावण्यासाठी पत्र पाठवा जो पर्यंत निवडणूक होत नाही तो पर्यंत पत्र व्येवार सुरू ठेवणे बाबत २) ग्रामपंचायतीने ग्रामसभेत बियर बार चा ठराव दिलेला नाही तरी देखील बियर बार चे लायसन्स कसे मिळाले याची चौकशी तात्काळ करण्या बाबत ३)असलोद ओपी पासुन ते मदाणा शिव पर्यंत सर्व ढाब्याचे खानावळ परवानगी रद्द करण्या बाबत४)असलोद ओपी पासुन ते मदाणा शिव पर्यंत सर्व ढाब्याचे मालक व जागा मालक यांना दारुबंदी या ठरावाची अंमलबजावणी साठी तात्काळ नोटीसा देण्यात याव्या तसेच त्या सर्व नोटीस वरिष्ठ शासकीय व पोलीस अधिकारी यांना माहिती साठी पाठवण्यात यावी या बाबत..५)असलोद गावात गेल्या पंधरा वर्षांपासून दारुबंदी ठराव केलेले आहेत तसेच तुम्ही देखील दारुबंदी असल्याचे लेखी दिलेली आहे तरी दारुबंदी ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी ढाबे मालक व जागा मालक व पोलीस स्टेशनला सर्व ठरावाच्या नक्कला व नोटीसा देवुन माहिती देण्यात यावी.६) असलोद तलाठी यांनी शेतीचा उपयोग दारु विक्रीसाठी परवानगी दिली आहे का ?व शेतात कच्चे व पक्के ढाबे शेतात बांधण्याची परवानगी दिली का ? या बाबत..७)असलोद ओपी पासुन ते मदाणा शिव पर्यंत बेकायदेशीर ढाब्ये जेसीबी च्या सहाय्याने काढण्याबाबत ८) दारू बंदी होत नसल्याने ग्रामपंचायतीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर असलोद गावाचा बहीष्कार राहील यांची सर्व माहिती शासकीय अधिकारी पंचायत समिती सदस्या, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री दोघी,व मुख्यमंत्री यांना ठरावाच्या प्रती पाठवण्या बाबत.. एवढ्या विषयावर ग्रामसभेत ग्रामपंचायतीने कार्यवाही करावी असे ठरविण्यात आले एवढे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले या ठरावाचे सुचक जगन झिपरु कोळी होते व अनुमोदक राजु संतोष वानखेडे हे होते सर्व ठराव मंजुर झाल्यानें ग्रामसभेत दारुबंदी होत असल्याने आनंदाचे वातावरण सभेत होते आता ग्रामपंचायतीने वरील विषय मार्गी न लागल्यास गावकरी पुढच्या ग्रामसभेत विचारणा करतील त्यामुळे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी मुकेश जाधव यांना दारुबंदी व्हावी यासाठी कार्यवाही करणे भाग आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!