*बहिणींवर अत्याचार करण्याऱ्याला भरचौकात फाशी द्या,मानव विकास पत्रकार संघ*
शिरपूर. प्रतिनिधी
शिरपूर. प्रतिनिधी ९ ऑगस्ट रोजी आर.होय. मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर बहिणींवर अत्याचाराच्या घटनेतील दोषींना तात्काळ भर चौकात फाशीची शिक्षा द्या,तसेच विविध ठिकाणी मुलींवर झालेल्या अमानुष घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या असा निवेदन २६ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील महिला व मुलींवरील अत्याचारात सहभागी असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करा. शाळा, महाविद्यालयांमध्ये सी.सी.टी कॅमेरा स्थापित करा. महाराष्ट्रात महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून त्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. तरी बदलापूरच्या घटनेतील लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांना तसेच कोलकाता येथे झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशीची शिक्षा द्या. देशात आणि महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना तात्काळ थांबवा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करा. तसेच नुकतेच चोपड्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा. महिला आणि मुलींच्या सुरक्षेची हमी द्या अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना या वेळी मानव विकास पत्रकार संघ प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वसीम हुमायून खाटीक.सल्लागार वोकार आबा जाधव. धुळे जिल्हा संघटक मोहसीन शेख, तालुकाध्यक्ष कैलाश सिंह सिसोदिया,सुभाष सिंह,दीपक माळी,अल्त्मश शेख रफिक,राकेश राजपुरा,विनोद गव्हाणे,रवींद्र पुरी,न्यानेश्र्वर पाटील,फारुख खाटीक, ओ,आर बोरसे,अतुल भील,वैभव वसंत पाटील, बिलाल शेख,दत्तू पाडवी, कालू शाह, लिबास मंसुरी,अतुल भील,आदी पदाधिकारी उपस्थित होते,