किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ.विजयराव व्ही. रंधे इंग्लिश मीडियम स्कूल येथे बैलपोळा साजरा
विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ. विजयराव व्हीं . रंधे इंग्लिश मीडियम स्कूल शिरपूर येथे बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी एस.पी.डी.एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. फुला बागुल सर व शिंगावे येथील प्रगतिशील शेतकरी श्री संदीप पाटील यांच्या हस्ते बैल पूजन करण्यात आलं यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य सारिका ततार प्रमोद पाटील मनीषा लोखंडे , संज्योती पाटील, शिक्षक बंधूंनी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. फुला बागुल सर यांनी भारतीय संस्कृतीचे जतन करून विविध सण उत्सव साजरे करणारी इंग्रजी माध्यमाची शाळा ही कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन केले.तर मंगला मराठे यांनी बैलपोळा विषयी मुलांना माहिती दिली तसेच याप्रसंगी प्रा. फुला बागुल सर संदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांनी बैलांची सजावट केली तर तिसरीच्या मुलांनी शेतीला लागणारी अवजारेची प्रतिकृती बनवून प्रदर्शन मांडल्या इयत्ता चौथीच्या मुलांनी मातृदिनानिमित्त आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे व्हिडिओ क्लिप तयार केले व आशीर्वाद घेतले तर नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी बैलगाडीत बसून आनंद ची सफर केली.
या उपक्रमाचे किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषारजी रंधे सचिव नानासाहेब निशांतजी रंधे खजिनदार आशाताई रंधे विश्वस्त रोहित बाबा रंधे यांनी कौतुक केलं.