नंदुरबार जिल्ह्यात पत्रकारांची सुरक्षा एरणीवर,भर दिवसा पत्रकारावर जीव घेणा हल्ला., पोलीस प्रशासन मात्र सुस्त..
पत्रकार लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मानला जातो, वेळोवेळी अन्ययाला वाचा फोडन्याच काम अविरत करत असतो दुसऱ्याची समस्या, आणि नागरिकांची सुरक्षा यासाठी नेहमीच झटत असतो पण त्यांच पत्रकार पण तो पत्रकार सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सामाजिक व अन्यायाच्या विरोधात सतत लढत राहणारे… डिजिटल मीडियाचा
पत्रकार कैलास सोनवणे यांचा.दोन दिवसा अगोदरच काही गाव गुंड्याच्या साह्याने जबर मारहाण करण्यात आली ….
सविस्तर वृत्त असे की, पत्रकार कैलास सोनवणे हे पत्नीसह मोटरसायकल ने घराकडे जात असताना….गाव गुंडानी रस्तात अडवून मिरची पावडर ची पुठ फेकून जबर मारहाण केल्याने…. डोक्यात रोडने व लाठी काठीने मार दिल्याने हाता, पायाला व डोक्यावर जबर दूखापत झाली आहे.असून त्यांना
शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचारा साठी दखल करण्यात येऊन त्याच्यावर उपचार सुरू आहे.
तसेच सदर गाव गुंडयांनी पत्रकार कैलास सोनवणे व त्यांच्या परिवारास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.सदरील घटना पोलीस प्रशासन यांच्या लक्षात आणून दिली असून देखील पोलीस प्रशासन मार्फत कुठलीही कार्यवाहीचे पाऊल उचलण्यास हतबल का? सदर घटनेला दोन दिवस उलटूनही
सदर आरोपी आज पावोत मोकाट फिरत असून अटक करण्यात आलेले नाही.. दिवसा ढवळ्या मोटार सायकल अडवून सिने स्टाईल ने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला जातो यावरून अस दिसत की जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरलेला नाही.
एखाद्या पत्रकारचा जीव गेल्यावर कार्यवाही करणार का? सदरील दोषी गाव गुंडाच्या मुसक्या आवळल्या नाही तर शहादा तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना मार्फत जिल्हा स्तरावर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे