*चोपडा बस स्थानकात एस टी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्या करता काम बंद धरणे आंदोलन*
चोपडा प्रतिनिधी भिकन कोळी
महाराष्ट्र कामगार कृती समितीच्या वतीने एस टी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्या करता काम बंद धरणे आंदोलन पुकारण्यात आले असून चोपडा आगारातून सकाळच्या मुंकामी गाड्या सोडण्यात आले असून दुपारी बारा वाजे नंतर १०० टक्के वाहतूक बंद राहील असे विभागीय सचिव पंडित बाविस्कर यांनी सांगितले जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील असे कामगार समितीचे तालुका अध्यक्ष रमेश अहिरे यांनी सांगितले २०१६ पासून २०२४ महाराष्ट्र कामगार कृती समितीची( एस टी कर्मचाऱ्यांची) कुठलीही दखल घेतली नाही म्हणून गणपती उत्सव तोंडावर असताना अत्यंत राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना जेवढे वेतन मिळते तेवढे एसटी कर्मचाऱ्यांना मिळावे ही प्रमुख मागणी असून तसेच कोकण फेऱ्या साठी बुक केलेल्या गाड्या जाणार नाही म्हणून हे काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती विभागीय सचिव पंडित बाविस्कर यांनी दिली ह्या वेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश अहिरे,कांतीलाल साळुंखे ,देवकीनंदन चावरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते