शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मा.अभिजीतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त *जिल्हास्तरीय ‘मिनी मॅरेथॉन’* स्पर्धेचे आयोजन.
‘स्त्री’ ही आदिशक्तीचे रुप आहे. स्त्रीमध्ये प्रचंड उर्जेचा स्त्रोत असतो. गृहिणी म्हणून घराला घरपण यावं यासाठी आपलं सर्वस्व ती पणाला लावत असते; पण हे सगळं करत असतांना तीला स्वत:च्या आरोग्यासाठी अजिबात वेळ देता येत नाही. ‘ती’ आपल्या आरोग्याबाबत सजग व्हावी आणि सुदृढ आरोग्यासाठी दररोज थोडासा वेळ आपण स्वत:साठी दिला पाहीजे. ही भावना तीच्यात रुजावी म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये *ज्यांचे वय १५ वर्ष पूर्ण आहे आणि ज्या शारिरीक दृष्ट्या तंदुरुस्त आहेत* अशा सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर जाऊन गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे. *https://shorturl.at/HTHVX*