. वनक्षेत्रपाल तळोदा यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे
प्रतिनिधी = कृष्णा कोळी
मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवूर्ती धुळे यांच्या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा मेवासी उप वनसंरक्षक अधिकारी ( *प्रादेशिक) तळोदा व सहायक वनसंरक्षक अधिकारी (प्रादेशिक )तळोदा यांच्या अंतर्गत अक्कलकुवा येथिल कुरेशी यांच्या वखारीत बेकायदेशीर खैर जातींचे 77 लाखाचे ईमारती लाकुड पडुन असल्या मुळे अमलबारी दोषी वनपाल यांना तात्काळ विभागीय वन अधिकारी (दक्षता विभाग) धुळे यांच्या चौकशीत निलंबित केले आहे तरी वनपाल सारखेच दोषी तात्कालीन वन क्षेत्रपाल तथा सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी (प्रादेशिक) तळोदा हे पंण तेवढेच दोषी असुन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी सामजिक कार्यकर्ते कृष्णा दादा निकम नरेश भाऊ शिंदे यांनी मुख्य वन संरक्षक अधिकारी वन वृत्ती धुळे यांच्या कडे पुराव्या निशी तक्रार दाखल करून निलंबित करण्याची मागणी केली आहे या बाबत सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा येथिल कुरेशी यांच्या वखारीत गुजरात व महाराष्ट्र राज्यातुन बेकायदेशीर वाहतूक करून लाखो रुपयेचा खैर जातींचे ईमारती लाकुड आणुन ठेवले होते तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात खैर जातींचे लाकुड वाहतूक करून आणता असताना सहायक वनसंरक्षक अधिकारी (प्रादेशिक )तळोदा यांनी लक्ष का दिले नाही तसेच खैर जातींचे ईमारती लाकुडची वाहतूक पास देताना किंवा वखारीची तपासणी करताना हा सगळा प्रकार लक्षात का आला नाही परंतु हा सगळा प्रकार तात्कालीन वन क्षेत्रापाल तथा सहायक वनसंरक्षक अधिकारी (प्रादेशिक) तळोदा यांना माहिती असतानाही जाणुन बुजुन हेतुपुरस्कर कारवाई केली नाही तसेच लाकुड व्यपाऱ्यासी संगनमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे दिसून येते आहे तरी मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवूर्ती धुळे यांच्या अंतर्गत व विभागीय वन अधिकारी (दक्षता विभाग )यांच्या चौकशीतून हे वन अधिकारी दोषी निष्पन्न झाल्याने तात्काळ सहायक वनसंरक्षक अधिकारी (प्रादेशिक )तळोदा यांना निलंबित करण्यात यावे तसेच कायदेशीर तात्काळ कारवाई न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असे कृष्णा दादा निकम व नरेश भाऊ शिंदे यांनी मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवूर्ती धुळे यांच्या कडे तक्रार दाखल करून मागणी केली आहे.