बुधवारी शहादा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समिती यांच्यामार्फत शहादा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक यांचे सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले शहादा तालुक्यातील विविध संघटनेच्या शिक्षकांनी सामूहिक रजा आंदोलन करून गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना सर्वसमावेशक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात संचमान्यता शासन निर्णय दि.१५ मार्च २०२४ व कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय, शिक्षण हक्क कायदा – २००९ मधील तरतुदीस विसंगत दि. १५ मार्च २०२४, ५ सप्टेंबर २०२४ (सुधारित २३ सप्टेंबर २०२४) च्या शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्वच संपणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण संपविण्याचे धोरण अलीकडे घेतलेल्या शासन निर्णयामुळे अधोरेखित झाले आहे. यासह अन्य मागण्यांच्या सोडवणुकी संबंधाने शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही. प्राथमिक शिक्षक संघटनांसह चर्चा करून प्रश्न समजून घेणे व त्यावर अनुकूल असा निर्णय घेण्याच्या बाबतीत प्रचंड उदासीनता आहे. त्यामुळेच अत्यंत व्यथित होऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षक आणि तेथे शिकणाऱ्या पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेता राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांना तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पुणे येथे दि. १४ सप्टेंबर २०२४ रोजी निर्धार बैठक संपन्न झाली. या बैठकीत निश्चित केल्यानुसार खालील मागण्यांसाठी आंदोलन करीत असल्याचा नोटीस दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी शासनाकडे देण्यात आला. त्यानुसार आंदोलन पुकारण्यात येत आहे. मागण्या पुढीलप्रमाणे आहेत – १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. , २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा ५ सप्टेंबर २०२४ (सुधारित २३ सप्टेंबर २०२४) चा शासन निर्णय रद्द करावा, विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे. , शैक्षणिक-अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी.,विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत. २०२४-२५ वर्षात राबविलेली गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात.,जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करणे., शिक्षण सेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर शिक्षक म्हणूनच नियुक्ती व्हावी.राज्यातील शिक्षकांना १०-२०-३० सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी. सर्व पदवीधर विषय शिक्षकांना शिक्षण आयुक्तांच्या शिफारशीनुसार सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळावी. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात निघालेल्या आणि नंतर सेवेत आलेल्या जिल्हा परिषदांच्या शाळांतील शिक्षक व जि प कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १९८२ च्या पेन्शनचे आदेश निर्गमित करावे. ज्यांना पेन्शन लागू नाही अशा सर्वच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना १९८२ ची पेन्शन योजना लागू व्हावी. सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षक व तसेच शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन त्रुटीचा अहवाल प्राप्त करून वेतन त्रुटी दूर कराव्यात. ,अनुकंपा तत्त्वावर नियुक्त शिक्षकांना TET अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा., नपा / मनपा (गट क / ड) मधील शिक्षकांच्या वेतनाचे १००% अनुदान शासनाने द्यावे. नपा मनपा (गट क / ड) मधील शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीत E-Kuber अंतर्गत व्हावे.,शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी., स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळात वाढती अनेकविध अभियाने, उपक्रम, निरनिराळे सप्ताह, बहि:शाल संस्थांच्या परीक्षा, Online माहित्यांची वारंवारिता इत्यादी कामे ताबडतोब थांबवावी. मागण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांना देण्यात आले आहे असे नमूद करण्यात आले निवेदनात याबाबत शासन स्तरावरून अनुकूल निर्णय होत नसल्याने सर्व प्राथमिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यआज दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी प्राथमिक शिक्षकांनी सामुहिक किरकोळ रजा घेऊन संपूर्ण राज्यात मोर्चा काढला आहे. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागण्यांबाबत तातडीने आवश्यक अनुकूल कार्यवाही करावी अन्यथा अधिक तीव्र आंदोलनाशिवाय राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांना तरणोपाय राहणार नाही असे स्पष्ट करीत आहोत. याबाबत निवेदन प्रत्येक जिल्हा स्तरावर देण्यात येत आहेत, परंतु आपल्या नंदुरबार जिल्ह्याची सामाजिक परिस्थिती बघता आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जमावबंदी लागू असल्या करणे शहादा तालुक्यातून तालुकास्तरावरून मानानिय गटविकास अधीकारी साहेब यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. प्रसंगी उपस्थित प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुका अध्यक्ष तुकाराम गुंडेराव अलट, कोषाध्यक्ष – राकेश संजय पाडवी, प्रहार संघटनेचे केंद्र संघटक संतोष जगताप,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नंदुरबार जिल्हा सरचिटणीस शांतीलाल रामचंद्र अहिरे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे शहादा तालुका अध्यक्ष मन्मथ संभाजी बरडे, तसेच अखिल शिक्षक संघाचे चेतन विजय पाटील,राकेश धनराज अहिरे, तालुका सहसचिव श्रीनिवास बालाजीराव जोगदंड, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा संघटक शक्ती लक्ष्मण धनके, रवींद्र सुभाष पाटील, निलेश जगदीश शिवदे, उमेश शिवराज पाटील, जिल्हा संघटक विशाल गुलाबराव शिसोदे, तसेच जिल्हा परिषद शाळा निंभोरा येथील शिक्षक निर्मल कुमार रमेश पाटील, जिल्हा परिषद शाळा भोंगरे येथील शिक्षक करणसिंग शंकर तडवी, व कपिल हिम्मत चव्हाण, जिल्हा परिषद शाळा कोठली येथील शिक्षक मनोज भगवान राठोड, जिल्हा परिषद शाळा कल्याणपुरा येथील पंढरीनाथ निंबा धनगर, जिल्हा परिषद शाळा उमरटी येथील अतुल कालिदास तांबुरे जिल्हा परिषद शाळा काथरदे दिगर जुनी पेन्शन संघटना सचिव ज्ञानोबा तेजेराव सुरनर, जिल्हा परिषद शाळा परिवर्धा येथील केंद्रमुख्याध्यापक व राष्ट्रीय राज्य आदर्श पुरस्कार शिक्षक संघाचे जिल्हा सचिव अमृत नामदेव पाटील, जिल्हा परिषद शाळा पळसवाडा येथील विनोद आसाराम येळवे, अखिल शिक्षक संघाचे केंद्र संघटक श्रीकांत पुंडलिक जगताप आदी शिक्षक मोठ्या संख्येने निवेदन देणे प्रसंगी उपस्थित होते.”””””” महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना एकत्र येऊन समन्वय समिती मार्फत आजचे राज्यभर करण्यात येणारे हे सामूहिक रजा आंदोलन केवळ शिक्षकांच्या आर्थिक मागणीसाठी नाही तर आजचे आंदोलनातील प्रमुख मागणी म्हणजे गोरगरिबांच्या मुलांना शिकता येतील अशा सरकारी शाळा टिकून राहाव्यात आणि गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं शिक्षकांकडे केल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांचा भडिमार थांबवण्यात यावा आणि शाळा, शिक्षक विद्यार्थी यांचे नुकसान होईल असे काढलेले सरकारी शाळा बंद पडतील असे अनेक शासन निर्णय काढलेले मागे घेतले जावेत यासाठी हे आंदोलन आहे. “””””शांतीलाल अहिरे, जिल्हासरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
Related Posts
पवित्र क्षेत्राला लाचखोरीचे ग्रहण, शिक्षण विभाग कलंकित**गटशिक्षण अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात*
*पवित्र क्षेत्राला लाचखोरीचे ग्रहण, शिक्षण विभाग कलंकित**गटशिक्षण अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात*धुळे – शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनात अमुलाग्र बदल…
शिंदखेडा तालुक्यातील सर्व जातीधर्मातील नागरिकांना व सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती*
*शिंदखेडा तालुक्यातील सर्व जातीधर्मातील नागरिकांना व सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती* नमस्कार मित्रांनो मी आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा.. आपल्याला सुचित…
*डॉ पंजाबराव देशमुख यांच्या125 व्या जयंती निमित्त “कृषि संजीवनी पंधरवडा” चे आयोजन*
महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे मार्फतडॉ पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कृषी विभागाच्या वतीने डॉ पंजाबराव देशमुख कृषि संजिवनी…