*चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभी असलेली रुग्णवाहिकेला लागली आग..
*जिल्हा प्रतिनिधी: भिकन कोळी
चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभी असलेल्या 108 रुग्णवाहिकेला पहाठे सव्वा चार वाजता अचानक आग लागली आग लागल्याचे कमलेश साहेबराव धनगर सिटी स्केन टेक्निशियन हे पहाटे बाथरूम साठी उठले असता रुग्ण वाहिकेचा पुढील भागात आग लागल्याचे त्यांना दिसले त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाला कळविले पहिले 112 वर कॉल केला असता प्रतिसाद मिळाला नसल्या मुळे हिम्मत धनगर व कमलेश धनगर यांनी मोटर सायकल वर चोपडा नगरपालिकेत धाव घेत अग्निशमन दलास सोबतच आणले.आग विजवण्या साठी घटनास्थळी कमलेश धनगर, सुरक्षा रक्षक दीपक बडगुजर, 108 चे पायलठ नदीम शेख, 108 पायलट हिम्मत धनगर, फायर ब्रिगेड कर्मचारी संदीप कोळी, गणेश पाटील, राकेश सोनवणे, वसंत सपकाळे, यांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आगीवर नियंत्रण मिळवले तो पर्यंत रुग्णवाहिका जळून पूर्ण खाखं झाली होती. रुग्णवाहिकेत दोन गॅस सिलेंडर फुल भरलेले होते तरी सुदैवाने कुठल्याही प्रकारचे मोठा अपघात झालेला नसल्याचे पायलट हिम्मत धनगर यांनी सांगितले…