*शिंदखेडा- झोटवाडे गावाजवळील अमरावती नदीकाठावर संरक्षण भिंतीची गरज , दुर्घटना घडण्याची शक्यता*झोटवाडे गावात अमरावती नदीवर संरक्षण भिंत नसल्याने या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. झोटवाडे गावातील संरपच व संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे.मालपुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळदार पाऊस झाल्याने मालपुर धरण हे पुर्ण क्षमतेने भरले असून काल दि. 27 सप्टेंबर रात्री धरणाचे दोन गेट उघडण्यात आले त्यामुळे अमरावती नदीला पुर आला अमरावती नदी ही झोटवाडे गावाजवळून जात असल्याने व संरक्षण भिंत नसल्याने पुराचे पाणी हे गावात शिरते भविष्यात संरक्षण भिंत न बांधल्यास मोठी जिवीतहानी होऊ शकते. झोटवाडे गावातील संरपच व संबधित विभागाने पाहणी करून संरक्षण भिंत बांधावी वेळीच याठिकाणी उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते अशी भिती ग्रामस्थानी वर्तवली आहे.आण्णा कोळी महादेवपुरा दोडाईंचा
झोटवाडे गावाजवळील अमरावती नदीकाठावर संरक्षण भिंतीची गरज , दुर्घटना घडण्याची शक्यता
