असलोद येथे गणू चित्रपटाचे चित्रीकरण ९ ऑक्टोबर ला

असलोद येथे गणू चित्रपटाचे चित्रीकरण ९ ऑक्टोबर ला

प्रतिनिधी = कृष्णा कोळी

*नंदूरबार* – शहादा तालुक्यातील असलोद येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीतील दोन्ही हाताने अपंग असलेला गणेश अनील माळी यांच्या जिवनावर आधारीत ३५ ते ४० मिनीटाचा चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात असलोद येथून ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक,लेखक सुनील कुमार देवरे व निर्माते पढरिनाथ धनगर हे आहेत.*या चित्रपटातील कलाकार*गणु या चित्रपटात मुख्य कलाकार सुनील कुमार देवरे,ऋतिका कुमारी राजपूत, प्रणाली भावसार,ललिता माळी, गणेश अनील माळी,अनिल माळी, गणेश सोनवणे,शाम राजपूत,राज कोळी, तसेच जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा असलोद येथील बालकलाकार व कनकेश्वरी क्लासेस चे काही विद्यार्थी असे एकूण पंच्येचाळीस वरीष्ठ व बाल कलाकार काम करणार आहेत *या स्थळावर होणार चित्रपटाची शूटिंग*गणु या चित्रपटाची सुरुवात असलोद गावात व जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथुन सुरुवात होईल. त्यानंतर कनकेश्वरी क्लासेस येथील परिसरात शुटिंग होणार आहे. त्यांनंतर निसर्गरम्य वातावरणातील खापरखेडा धरण ,त्या परिसरातील पहाडी दृश्य, डोंगरगाव सावखेडा मधील वळणावर व काही दृश्यं मध्यप्रदेश सिमेलगत पहाडी परिसरात शुटिंग होणार आहे*गणेश माळीची व्यथा व संघर्षमयी जीवन कहानी* गणेश अनील माळी हा दोन्ही हाताने अपंग आहे. तो पायाने लिहितो , जेवण पायाने करतो व इतर सर्व कामे पायानेच करतो. याची आई लहानपणीच याला सोडुन गेली आहे .याचे पालनपोषण त्याचे वडील करतात.गेल्या वर्षी गणेश माळी यांची जीवन जगण्याची धडपड व त्याची सर्व संघर्षमयी व्यथा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष यांनी वृत्तपत्रात दिली व सर्व प्रथम लोकमत वृत्तपत्राने प्रसिद्ध केली. ही बातमी प्रचंड व्हायरल झाली.लोकांमध्ये गणेश माळी यांच्या बद्दल आस्था निर्माण झाली व त्यानंतर इतर बऱ्याच वृत्तपत्रातून अपंग गणेश माळीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्यांची दखल आमदार राजेश पाडवी व शहादा तालुक्यातील इतर अनेक राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यानी गणेश माळी यांची भेट घेतली होती व त्याला सर्वतोपरी मदत देखील केली. एवढेच नाही तर गणेश माळी यांची व्यथा थेट मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांच्या पर्यंत पोहोचली. त्यांनी गणेश माळी यांची परिस्थिती नाजुक असल्याने त्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. तेव्हापासून गणेश माळी हा सर्व महाराष्ट्रात परिचीत झाला. गणेश माळी यांच्या व्यथा व जीवन जगण्याची संघर्षमयी कहाणी ही चित्रपट निर्माते पढरिनाथ धनगर व चित्रपट निर्देशक लेखक सुनील तिरमले यांच्या पर्यंत पोहचल्यावर त्यांवर चित्रपट तयार करणार असल्याचे सांगितले व गणु चित्रपटाच्या काही दिवसांपूर्वी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शन देखील करण्यात आले. आता प्रत्यक्षात गणु चित्रपटाची सुरुवात असलोद गावातुन होणार आहे .असलोद गावात चित्रपटाचे चित्रीकरण होणार असल्याने असलोद गावाचे नाव देखील महाराष्ट्र भर पोहचेल. बालकांसह आनंदाचे वातावरण गावात पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!