भारतीय डाक विभागा कडून दोन ग्रामीण टपाल विमा दाव्याचे भुगतान करण्यात आले.

भारतीय डाक विभागा कडून दोन ग्रामीण टपाल विमा दाव्याचे भुगतान करण्यात आलेभारतीय डाक विभागाच्या वतीने प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण टपाल विमा व टपाल विमा ही सेवा पुरवण्यात येते. भारतीय डाक विभाग “डाक सेवा जन सेवा “ या ब्रीद वाक्या अनुसार काम करत आहे. साई सेवाराम नगर, शहादा जिल्हा नंदुरबार येथील रहिवासी कै नरेंद्र सजन पाटील यांनी त्यांच्या हयातीत भारतीय डाक विभागाचा तीन लाख व पाच लाख रुपयाचा असे दोन ग्रामीण टपाल विमे काढले होते. त्यांचे दिनांक 27.06.2024 रोजी निधन झाले होते. त्यांनी भारतीय डाक विभागाचा ग्रामीण टपाल विमा घेतांना एका पोलिसी ला त्यांच्या पत्नी श्रीमती नीता नरेंद्र पाटील (तीन लाख विमा) (Rs.6,91,000/-) व दुसऱ्या पोलिसी ला त्यांच्या आई श्रीमती रजनी सजन पाटील (पाच लाख विमा) (Rs.7,70,400/-) यांना वारस म्हणून नामनिर्देशीत केले होते. श्रीमती नीता नरेंद्र पाटील व श्रीमती रजनी सजन पाटील यांनी कै नरेंद्र सजन पाटील यांच्या भारतीय डाक विभागाचा ग्रामीण टपाल विमा दोन दावे धुळे मुख्य टपाल कार्यालयाकडे काही दिवसांपूर्वी सादर केले होते. भारतीय डाक विभागाने सदरहू दोन्ही दाव्याची आवश्यक चौकशी व योग्य कागदपत्राची तत्काळ पूर्तता करून घेतली.श्री जि हरी प्रसाद , प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, व श्री राजीव पालेकर , प्रवर डाकपाल धुळे व श्री एस पी कोळपक , सहायक अधीक्षक (दौरा) धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 03.10.2024 रोजी श्री.अंकुश मदन , डाक निरीक्षक, शहादा उपविभाग यांनी श्री पवन भामरे , उप डाक पाल , शहादा उप डाक घर व इतर कर्मचारी तसेच नातेवाईक यांच्या उपस्थितीत मृताचे वारस पत्नी श्रीमती नीता नरेंद्र पाटील यांना (Rs.6,91,000/-) चा व श्रीमती रजनी सजन पाटील यांना (Rs.7,70,400/-) चा धनादेश प्रदान करण्यात आला.एवढ्या कमी कालावधीत दाव्याची पूर्तता करून दिल्याबद्दल भारतीय डाक विभागाचे व प्रवर अधीक्षक डाकघर धुळे विभाग, प्रवर डाक पाल धुळे व डाक निरीक्षक शहादा यांचे श्रीमती नीता नरेंद्र पाटील व श्रीमती रजनी सजन पाटील यांनी आभार मानले. तसेच त्यांनी भारतीय डाक विभागात केलेली गुंतवणूक खात्रीशीर असल्याचे सांगितले व नागरिकांना भारतीय डाक विभागात बचत करण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!