बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचा दसरा उत्सव रेल्वे प्रवाशांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न.

बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचा दसरा उत्सव रेल्वे प्रवाशांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न. ———————————————————–बदलापूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-दसरा सण मोठा,आनंदाला नाही तोटा.रेल्वे मध्ये दस-याच्या आदल्या दिवशी रोज नित्य नेमाने प्रवास करणारे प्रवासी रेल्वे आपली धमनी आहे,जीवनवाहिनी आहे आणि वर्षभराचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून नवदुर्गेची व रेल्वेची पुजा केली जाते व एकमेकांना दस-याच्या शुभेच्छा दिल्या जातात.बदलापूर शहराची लोकसंख्या वाढत आहेत,त्याप्रमाणात रेल्वेच्या फे-या वाढत नाही.तरीही आपण आहे त्या परिस्थितीत रेल्वेने प्रवास करतो.बदलापूर रेल्वे स्टेशनवरील सर्व कर्मचारी,आर पी एफ जवान,जी आर पी जवान,टी.सी.व अन्य स्टाफ बदलापूर रेल्वे स्टेशनसाठी योगदान देत असतो.यांचा मान सन्मान व्हावा म्हणून बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने फ्लॅटफाॅर्म क्र.३वरिल ठाकरे पेपर स्टाॅल जवळ दस-याच्या मुहूर्तावर कर्मचा-यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्टेशन मास्टर एस.आर.सिंग,आर पी एफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष अहिरवार,असिस्टंट पोलिस निरिक्षक लक्ष्मी नारायण,तिकीट तपासनिक प्रमुख श्री.मोडक हे उपस्थित होते.या सर्वांचा सत्कार संघटनेच्या पदाधिका-यांनी न करता आपला केंद्र बिंदु हा रेल्वे प्रवासी आहे,उपस्थिती रेल्वे प्रशासनाच्या हस्ते शाल,श्रीफळ,स्नॅक्स बाॅक्स,देऊन करण्यात आला.यावेळी स्टेशन मास्टर एस.आर.सिंग यांनी तिसरी व चौथ्या मार्गिकेचे काम २०२५मध्ये सुरु होईल,पश्चिमेकडील प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे.महिला लोकल चालु करणे,१५डब्यांची लोकल चालु करणे यांचा पाठपुरावा चालु आहे ही कामे यथावकाश होतील असे सांगितले.तसेच आर पी एफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष अहिरवार यांनी रेल्वे ट्रॅक क्राॅस करु नये नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.तसेच यावेळी उपस्थित अधिका-यांसमोर रेल्वे प्रवाशांनीही आपल्या समस्या मांडल्या.संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नरसाळे यांनी रेल्वे प्रवाशांच्या विविध तक्रारींचा प्रशासनाकडे मांडल्या जातील व इतरही विविध समस्या निदर्शनास आणुन दिल्या.याप्रसंगी बदलापूर येथील पत्रकारांचाही संघटनेच्यावतीने”सन्मानपत्र”देऊन सत्कार करण्यात आला.बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचा हा दसरा उत्सव यशस्वी करण्यासाठी ॠषीकेश दरेकर,अनिल बामणे,प्रवासी मित्र प्रकाश पाटील,विनोद पाटील,नागेश शेरखाने सौ.प्रियांका म्हात्रे,पंकेश जाधव व इतर प्रवाशांनी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमासाठी अवि स्नॅक्स सेटरचा मालक गोविंद राज यांनी पाणी बाॅटल मोफत दिल्याकारणाने त्यांचे आभार मानण्यात आले.परंतु ख-या अर्थाने”दसरा उत्सव”ग्रुपवरील सदस्यांच्या भरीव आर्थिक योगदानामुळे यशस्वी झाला त्यांचे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नरसाळे यांनी अभिनंदन केले व विशेष आभार मानले.शेवटी बदलापूर रेल्वे स्टेशन वरील सर्व स्टाफला स्नॅक्स बाॅक्स व मिठाई बाॅक्स देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!