आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रात्यक्षिक व हृदयविकारावरील व्याख्यान संपन्न
धुळे- केंद्रीय खेळ क्रीडा मंत्रालय अंतर्गत माय भारत (भारत सरकार) व मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे, आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रात्यक्षिक व हृदयाचे आजार व घ्यावयाची काळजी या विषयावर शाळकरी मुलांची बौध्दीक पातळी वाढावी यासाठी आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडणे येथे दि. 13 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नैसर्गिक आपत्ती व आरोग्याची काळजी अंतर्गत हृदयाची घ्यावयाची काळजी व उपचार यासाठी भारत सरकारने देशभर जनजागृती मोहीत हाती घेतली असून धुळे जिल्ह्यात मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्थेच्या मदतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात एकूण 100 विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला.आपत्ती प्रतिसाद दलाचे श्री. प्रभाकर शिंदे, समादेशक तथा नियंत्रक अधिकारी राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे श्री. रुपदास सोनोने, सहा. समादेशक यांचे मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक श्री. सुनिल शिरसाठ, पोलीस नायक अशोक सोनवणे, पोलीस शिक्षक विठ्ठल दाबेराव, सोमनाथ सोलनकर यांनी आपत्ती बाबत जनजागृती केली व मुलांना सोप्या भाषेत समजेल अशा पध्दतीने मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक करुन दाखविले. प्लास्टीक बोटल एकमेकांना बांधून त्यात थर्माकॉलचे तुकडे टाकून चौकनी थर्माकॉल तुकडे वापरुन कमी खर्चात आपत्तीचे काळात आपण स्वतःचे रक्षण व इतराचा जीव वाचवू शकतो. प्रथमोपचारासाठी शाळकरी मुलांना वेगवेगळी प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आली. आग लागली असता आग कशी आटोक्यात आणावी यासाठी पुरेशा साधन सामग्रीसह प्रात्यक्षिक करुन दाखवली.दुसऱ्या सत्रात डॉ. योगेश पाटील वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका धुळे यांनी हृदयाचे आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी यावर दिर्घवेळ शाळकरी मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रात्यक्षिकासह समजावून सांगीतले. आपल्या कुटुंबात आई-वडिल. यांना बीपी, शुगर किंवा कुठलाही गंभीर आजार असल्यास महानगरपालिका धुळे येथे माझ्याशी संपर्क साधावा असे निक्षुन सांगितले, दैनंदिन आहार, पायी फिरणे या सारखे उपाय सुचविले. तसेच एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा त्रास होत असल्यास प्रथमोपचार कसा करावा यासाठी प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. सदर कार्यक्रम हा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन डॉ.डी.एम. आखाडे, अध्यक्ष-मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे यांनी केले.सदर कार्यक्रम हा माय भारत धुळे (भारत सरकार) जिल्हा युवा अधिकारी, मा. अशोक कुमारजी मेघवाल साो. यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कापडणे येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या स्वाती पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे यांनी असे विशेष कार्यक्रम आमच्या शाळा परिसरात राबवित राहावे असे मत मा. शशिकांतजी भदाणे अध्यक्ष नवजीवन विद्याविकास मंडळ कापडणे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना केले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. डी.एम. आखाडे यांनी विशेष कामगिरी बजावली. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रविण पाटील यांनी मांडली, तर सुत्र संचालन योगेश कुलकर्णी व आभार रोहन मोरे यांनी मानले.