*शेठ व्ही के शहा विद्यालयात गुणवंत मुख्यध्यापक व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न*
शेट व्ही. के.शाह प्राथमिक विद्यामंदिर शहादा व विकास प्राथमिक विद्यामंदिर शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय *श्रीमती शोभना पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्वोदय प्राथमिक विद्यामंदिर प्रकाशा येथील मुख्याध्यापक तसेच या शाळेचे माजी शिक्षक आदरणीय *श्री मनोज पाटील* यांना *शिक्षण विभाग नंदुरबार व नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे* गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाला त्यानिमित्ताने सरांच्या शालेय परिवारातर्फे सत्कार करण्यात आला तसेच याप्रसंगीझुंजार फाउंडेशन नंदुरबार यांच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यातील 20 विद्यार्थ्यांना उत्कृष्ट वकृत्व सादरीकरण केले म्हणून झुंजार फाउंडेशन मार्फत प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी *झुंजार फाउंडेशनचे अध्यक्ष कृष्णा कोळी व झुंजार फाउंडेशनचे सल्लागार संजय गुरव, नरेश शिंदे, सारिका पावरा, सोनिया वळवी* संकुलाच्या माध्यमिक विभागाचे उपमुख्याध्यापक आद. *श्री एस आर जाधव* सर सत्कारमूर्ती आदरणीय मुख्याध्यापक प्रकाशा याची *श्री मनोज पाटील* सर व सर्व सहकारी शिक्षक बंधू व भगीनी उपस्थित होते*”कोणताही विद्यार्थी असो,जर त्यांनी कोणताही स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल व यश मिळवले असेल अशा विद्यार्थ्यांचा सन्मान होणं फार गरजेचे असतात.विद्यार्थ्यांचा झालेला सन्मान त्यांच्या विकासासाठी मजबूत प्लॅटफॉर्म असतो.या कौतुकांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व पुढे हेच विद्यार्थी अजून जास्त मेहनत करून यश संपादन करतात.* *संजय गुरव (सल्लागार) झुंजार फाउंडेशन*