श्रीमती प्रिती टिपरे, तत्कालिन जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक्त तथा दंडाकारी व विद्यमान पोलीस अधीक्षक, नवी मुंबई यांची शिस्तभंग तथा विभागीय चौकशी करण्याचे आदेश मा. समीर सहाय, राज्य माहिती आयुक्त, पुणे खंडपीठ ने पोलिस महासंचालक, मुंबई यांना आदेश दिले तसेच माहिती अधिकार कायद्याची कारवाईची झळ सदर बझार पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीसांच्या चौकशी पर्यंत शेकणार …! सोलापूर पोलिस आयुक्तालयात एकच खळबळ.
सोलापूर :- येथील पोलिस आयुक्तालय चे तत्कालिन जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक् दंडाधिकारी, विभाग-२ व विद्यमान (सध्या) पोलीस अधीक्षक, डायल १९२, नवी मुंबई यांचे विरुध्द माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम २० (२) नुसार पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे शिस्तभंग विषयक कार्यवाहीची शिफारस तथा आदेश मा. समीर सहाय, राज्य माहिती आयुक्त, पुणे खंडपीठ, पुणे यांनी दिले आहे. तसेच पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी ही कार्यवाही सदर आदेश प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत सुरु करावी व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचा अनुपालन अहवाल आयोगास सादर करावा असे ही आदेशात नमूद केले आहे. सदर बाबत हकीकत असे आहे की, मा. पोलिस आयुक्तालय चे तत्कालिन पोलिस आयुक्त, पोलिस उप-आयुक्त. सहाय्यक पोलिस आयुक्ता तसेच सदर बझार पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांना दिनेशसिंग शितल व श्रीमती द्रोपतीबाई शितल यांनी दि. २९-६-२०२१, दि. १२-६-२०२१, दि.१८-६-२०२१, दि.२० – ३ – २०२१ रोजी C. I. D चौकशी करणे – श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर (सिव्हिल हॉस्पिटल) कार्यालय येथील तत्कालिन व विद्यमान अधिष्ठाता, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधिक्षक, आस्थापना ४ व ३ मधील वरिष्ठ व कनिष्ठ लिपीक आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यावर शितल कुटूंबियांची घोर फसवणूक करुन, शारिरीक, मानसिक त्रास देवून, जिवीत हानी, वित्त तथा आर्थिक हानी केल्याबद्दल तसेच मृताच्या पत्नीला शासनाच्या (विधवा स्त्रिला ) धोरणापासून वेळोवेळी मोठया प्रमाणात वंचित ठेवून पिळवणूक करुन व लज्जास्पद वागणूक देवून व अपमानित करुन अन्याय अत्याचार केल्याबद्दल संबधितावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करणे किंवा सखौल आणि नि:पष्क चौकशी करुन गुन्हे दाखल करण्यायाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांना शिफारस करणे बाबत अर्ज दिले होते.सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने ७ मुदयांवर माहिती विचारली होती. कोणत्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सखौल चौकशी केलेली आहे त्यांचे नावे व पदनामे मिळणे तसेच रितसर सखोल चौकशीसाठी पोलीसांनी बोलावलेलीची प्रत व जवाब घेतलेलीची प्रत मिळणे बाबत माहिती अधिकार खाली माहिती मागणी केली होती.तसेच तत्कालिन जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग-२ सोलापूर शहर, श्रीमती प्रिती टिपरे यांनी माहिती अर्जास जाणुनबुजून माहिती नाकारुन अधिनियमातील कलम ७ (१) चा भंग केलेला असल्याने त्यांचे विरुध्द कलम २० मध्ये नमूद तरतुदीनुसार कार्यवाही का करण्यात येऊ नये ? याचा लेखी खुलासा त्यांनी आयोगाचे आदेश प्राप्त होताच आयोगास तात्काळ सादर करण्याचे आदेश माहिती आयुक्तांनी दिले होते.तसेच तत्कालिन जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग- २ सोलापूर शहर, श्रीमती प्रिती टिपरे यांनी त्यांच्या खुलासात असे नमुद केले होते थोडकयात की, आम्हास अर्जदार यांना वारंवार एकाच विषयासंबधीत माहिती मागणी करण्यात येवू नये असे सुचित करावयाचे होते परंतु माहिती मा.अ.अ.२००५ चे सुधारित कलम ३ (क) अन्वये एका वेळी एकाच विषयावर माहितीची मागणी करावी. अनेक विषयावर माहिती हवी असल्यास प्रत्येक विषयासाठी वेगळ / स्वतंत्र अर्ज सादर करावे असे अनावधानाने नमूद झाले आहे. मा. प्रथम अपिलीय अधिकारी यांना समक्ष भेटून आम्ही अनावधाने नमूद केलेल्या बाबीबाबत अवगत केले होते. प्रथम अपिलीय अधिकारी यांनी श्री. शितल यांचे प्रथम अपिल अर्ज दाखल स्तरावर नाकारले आहे. सदरची चूकभूल ही हेतूपुरस्सर अथवा जाणूनबुजून करण्यात आलेली नसून केवळ कामाच्या ओघात व अनावधाने झालेली आहे. तरी मा. महोदयांनी मी दिलेल्या खुलाशचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन कृपया मला एकवेळ क्षमापित करुन माझा खुलासा मान्य करावा ही नम्र विनंती केली होती.परंतु मा. समीर सहाय, राज्य माहिती आयुक्त, पुणे खंडपीठ, पुणे यांनी तत्कालिन जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग- २ सोलापूर शहर, श्रीमती प्रिती टिपरे यांचा खुलासा अमान्य करुन याबाबत तिव्र नाराजी व्यक्त करुन असे आदेशात असे नमूम केले की,उपलब्ध अभिलेखावरुन असे दिसून येते की, तत्कालिन जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग- २,श्रीमती प्रिती टिपरे यांनी सादर केलेला खुलासा त्यांनी दिलेल्या चुकीच्या उत्तराबाबतचे समर्थनीय व वाजवी कारण ठरत नाही, यावरुन असे दिसून येते की तत्कालिन जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-२ श्रीमती प्रिती टिपरे यांनी अपिलार्थी यांच्या माहिती अर्जास जाणूनबुजून चुकीचे उत्तर देऊन माहिती नाकारली आहे. त्यांची हि कृती कलम ७ (१) भंग करणारी असून कलम २० (२) नुसार शिस्तभंग विषयक कार्यवाहीस पात्र आहे.म्हणून श्रीमती प्रिती टिपरे, तत्कालिन जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक्त तथा दंडाकारी व विद्यमान पोलीस अधीक्षक, डायल – ११२, नवी मुंबई यांची शिस्तभंग तथा विभागीय चौकशी करण्याचे आदेश मा. समीर सहाय, राज्य माहिती आयुक्त, पुणे खंडपीठ ने पोलिस महासंचालक, मुंबई यांना आदेश पारीत केलेले आहे.*चौकट :- सोलापूर पोलिस आयुक्तालय आणि सदर बझार पोलिस स्टेशन येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी हे मनमानीकारभार करतात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व भारतीय दंड संहिता १८६० व इतर संबधित कायदे धाब्यावर बसवला आहे तसेच राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली येवून काम करतात माहिती अधिकारात विचारलेली माहिती देण्यास टाळाटाळ करतात दमदाटी करता खोटया गुन्हयात अडकवण्याची धमकी देतात. पण या प्रकरणी मी न घाबरता राज्य माहिती आयुक्तां पर्यत पाठपुरावा केला त्यामुळे संबधितांवर सदर कारवाई होत आहे.तसेच तत्कालिन व विद्यमान सहाय्यक पोलिस आयुक्त, विभाग- २ सोलापूर शहर आणि तत्कालिन व विद्यमान पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) सोलापूर शहर येथील अधिकारी व संबधितावर जास्तीस जास्त कठोर कारवाई होणेस नव्याने पाठपुरावा करणार.*