सेवा फाउंडेशन धुळे आणि सेवा धाम बहु उद्देशिय आयुर्वेद संशोधन संस्था धुळे संचलीत नालंदा गृह उद्योग धुळे तर्फे सैनिक लोंस सुरत बायपास धुळे येथे स्टॉल लावण्यात आला होता. जिल्हा महिला बाल विकास विभाग तर्फे सदर स्टॉल चे आयोजन करण्यात आले होते.त्यात वरील संस्थांतर्फे आवळ्याचे विविध प्रकार ठेवण्यात आले होते ते म्हणजे 1) आवळा कँडी 2) आवळा मुरंबा 3) आवळा तेल 4) आवळा मोरावळा 5) ताजे आवळे 6) केश्य तेल 7,) आवळा ज्यूस ई. प्रकार ठेवण्यात आले होते आणि त्यांना खुप जास्त प्रमाणात मागणी होती.सदर वेळी अध्यक्षा डॉ. चंद्रकला मोरे, आणि त्यांच्या सहकारी महिला सपना शिरसाठ सेक्रेटरी, मंजुळा पाटील,खजिनदार , शितल गांगुर्डे सदस्य, निता गांगुर्डे सदस्य, पाटील मॅडम यांनी सर्वांनी मेहनत घेतली आणि उत्तम रितीने काम केले मा. आमदार सौ. मंजुळा गावित यांनी आवळा पदार्थ घेतलें, माहिती विचारली आणि पदार्थांची चव घेवून कौतुकही केले आणि त्यांच्या साठी मागणीही केली तसेच जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही भेट दिली तसेच DYSP, SP, PSI आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांनीही भेट दिली, तसेच पूर्ण जिल्ह्यातून बचत गटाच्या महिलांनीही भेट दिली सर्वांनी आवळ्याच्या प्रकारांचे कौतुक केले.
जिल्हा महिला बाल विकास विभाग तर्फे सदर स्टॉल चे आयोजन करण्यात आले होते
