*नेर येथील चेतन जगदाळे याची वेट-लिफ्टींग विभागीय स्पर्धेसाठी नाशिक विभागातर्फे निवड*
✍🏻 *झुंजार कांती न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे
नेर-:धुळे तालुक्यातील नेर येथील कु.चेतन भिकन जगदाळे यांची सावित्रीबाई फुले पूणे विद्यापिठाच्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी नाशिक विभागातर्फे निवड करण्यात आली आहे.तसेच नाशिक जिल्हा विभागीय क्रिडा समिती नाशिक,यांच्या मार्फत आंतरविभागीय खेळाडूंची निवड करण्यासाठी नाशिक विभागातील सर्व वरिष्ठ महाविदयालयांच्या विभागीय वेट-लिफ्टींग आंतर महाविदयालयीन स्पर्धा सातपूर जि. नाशिक येथे संपन्न झाली. तसेच या स्पर्धेत के के वाघ महाविद्यालय,चांदोली.ता.निफाड,जि.नाशिक येथे शिक्षण घेत असताना धुळे तालुक्यातील नेर येथील कु.चेतन भिकन जगदाळे यांची सावित्रीबाई फुले पूणे विद्यापिठाच्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी नाशिक विभागातर्फे निवड करण्यात आली असून नेर गावासह परिसरातून मोठे कौतुक देखील करण्यात येत आहे.तसेच या स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक (गोल्ड पदक] मिळवत प्रथम क्रमांत पटकावला.म्हणून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच चेतन जगदाळे याला कॉलेजचे शिक्षक श्री सारंग नाईक सर,अनिकेत नवघने,कोल्हे सर व नेर येथिल मा.मंगेश मोहिते सर या शिक्षकांचे देखील मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.