*नेर येथील यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूला ऑस्ट्रेलियन धम्मचारी खेमधम्म यांची भेट* *नेर-:* धुळे तालुक्यातील नेर येथील यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल नेर येथे आज ऑस्ट्रेलियन धम्माचारी खेमधम्म यांनी सदिच्छा भेट देण्यात आली होती.तसेच विद्यार्थ्यांना आनापान विषयी मार्गदर्शन करत जीवनाच्या चढाओढीत ध्यान मनःशांती कसे देते याबद्दल मार्गदर्शन केले . धम्मचारी खेमधम्म हे ऑस्ट्रेलिया येथील सिडनी बुद्धिस्ट सेंटरशी जुळलेले असून त्यांनी या केंद्र उभारणीसाठी प्रमुख भूमिका निभावली. ते सखोल ध्यान अनुभूतीप्राप्त असे ध्यान गुरु आहेत. सन 1995 पासून ते ऑस्ट्रेलीयामध्ये नियमित ध्यान साधकांसाठी ‘इन्टेन्स मीडिटेशन शिबिराचे नेत्रुत्व् करित् असतात. त्यांनी ‘विजयलोक’ नावाचे शिबीर केंद्र बांधन्याकरिता अतिशय सिंहाचा वाटा उचलला आहे. ते 1994 साली भाजे या लेणीजवळ *धम्मचारी दिक्षा* घेऊन अध्यावत कार्यरत आहेत.. भारतात व भारताबाहेरही ते ध्यान पद्धातीचा प्रचार प्रसार करून मानवी मनाच्या विकासासाठी हातभार लावत आहेत. ध्यानातील विविध बाधांवर् कशा प्रकारे मात् करून सखोलता गाठायची यावर साधकांना मार्गदर्शन करतात.भारतातील ध्यान साधक मित्रांना भेट देण्यासाठी ते दरवर्षी भारतात येतात . यादरम्यानच त्यांनी शाळेस सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी हितगुज केले. यावेळी धम्माचारी तेजधम्म, धम्माचारि स्मृतिदीप आदी उपस्थित होते.✍🏻 *झुंजार क्रांती न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे*
Related Posts
शहादा येथे आदिवासी टोकरे कोळी समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
*शहादा येथे आदिवासी टोकरे कोळी समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन* *नेर-:* शहादा येथे टोकरे कोळी युवा मंच महाराष्ट्र राज्य,संचलित आयुष्याच्या…
आदिवासी कार्यकर्त्यांस शहादा पोलिसांकडून तुच्छतेची वागणूक!
*आदिवासी कार्यकर्त्यांस शहादा पोलिसांकडून तुच्छतेची वागणूक!**शहादा पोलीस ठाण्याचा मनमानी कारभार;पोलीस अधिकारी व कर्मचारी गैरहजर!**अर्ज स्वीकारले जात नसल्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!*शहादा:…
शहादा, डोंगरगाव, वडछिल मध्ये मे. स्वस्तिक कंपनीच्या ठेकेदाराने महसुल व वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने सरकारी पड राखिव वनविभागाच्या डोंगराचा लाखोटन गौण खनिज बेकायदेशीर काढला त्याबद्दल चौकशी करण्याची मागणी
शहादा, डोंगरगाव, वडछिल मध्ये मे. स्वस्तिक कंपनीच्या ठेकेदाराने महसुल व वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने सरकारी पड राखिव वनविभागाच्या डोंगराचा लाखोटन गौण…