*नेर येथे मुसळधार पाऊस;शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान* *कपाशी व मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान*
झुंजार क्रांती न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे*
✍🏻 **नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे काल रात्री झालेल्या परतीचा मुसळधार पावसामुळे कपाशी व मका पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच मुसळधार पाऊस धुळे जिल्ह्यात सुरू असून विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचे आगमन झाले आहे.तसेच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची जोरदार हजेरी लावली.तसेच तब्बल २ ते ३ तास पाऊस सतत पडल्यामुळे घरांची पडझड व पिकांची मोठे प्रमाणात नुकसान झालेले आहे.तसेच नेर येथील महालकाळी परिसरात शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून शेतकरी वर्ग देखील चिंतित झाला आहे.तसेच कापुस, मका, बाजरी पिक हे पूर्णपणे पावसाच्या पाण्या खाली गेल्याने नुकसान झालेले असून शेतकरी वर्गाकडून नुकसान भरपाईची मागणी देखील होत आहे.तसेच नेरसह खंडलाय,शिरदाने,जुने भदाणे,नवे भदाणे,अकलाड,मोराने,लोणखेडी,नांद्रे उभंड,देऊर या ग्रामीण भागात अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह पाऊस पडल्याने झाडे देखील मोठ्या प्रमाणात जमीनदोस झालेली आहेत.तसेच अवकाळी पाऊस पडल्याने ढगफुटी सारखे दृश्य हे बघायला मिळत आहे.तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच नेरगावसह परिसरात देखील ठिकठिकाणी पाणी साचले असून रस्त्यांवर देखील येण्याजाण्यात करिता नागरिकांना मोठा सामना करावा लागत आहे.तसेच शेतामधील कपाशीचे झाडे हे पाण्याखाली गेलेले आहेत.व ऐन वेळेस मका पीक काढणी सुरु असून अचानक पाऊस आल्याने मका पीक हे पुर्णपणे जमीन दोस्त झाले आहे.तसेच कापूस लावणी केलेली कपाशी पीक हे देखील पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे.तसेच नेर प्रगतीशिल शेतकरी येथील लोटन राजाराम अहिरे यांचे शेतातील मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. व फेमस टेलर याचे देखील शेतातील कपाशी पिकाचे मोठ्या नुकसान झालेले असून पंचनामे करून सरसकट भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग कडून करण्यात आली आहे.