पक्ष मजबुतीसाठी लढायचे; प्रकाशा मंडळातील भाजपा बैठकीत डॉक्टर विजयकुमार गावित यांचे मार्गदर्शन

*पक्ष मजबुतीसाठी लढायचे; प्रकाशा मंडळातील भाजपा बैठकीत डॉक्टर विजयकुमार गावित यांचे मार्गदर्शन*नंदुरबार – कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवून आपण जास्तीत जास्त चांगलं काम करून दाखवले. म्हणूनच पक्ष संघटन मजबूत करायचे आहे पक्ष वाढवायचा आहे या दृष्टिकोनातून पक्षाने आपल्याला पुन्हा संधी दिली आहे त्याचं सोनं करत असताना पक्षाने केलेले कार्य सांगण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि पक्ष मजबूत कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे, पक्षाचा विजय तोच आपला विजय हे मानून काम केले पाहिजे; अशा शब्दात नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे आज दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशा मंडळातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी वेगवेगळ्या गावातील काही कार्यकर्त्यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात सामूहिकपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया, तालुका अध्यक्ष ईश्वर भुता पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय पाटील आणि अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. महायुती सरकारच्या माध्यमातून भाजपा आणि मित्र पक्षांनी सामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी जे काम केले ते लोकांपर्यंत पोहोचवा. लाडकी बहीण, पिक विमा योजना, बचत गटातील महिलांना दिलेले गृह उद्योग, गाय वाटप, घरकुल, रस्ते विकास, पाणी योजना अशा विविध स्वरूपात प्रत्येक गावाच्या विकासासाठी दिलेला निधी, राबवलेल्या योजना आणि त्या माध्यमातून केलेली विकास कामे याविषयीची माहिती आपापल्या गावातील ग्रामस्थांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन याप्रसंगी केलेल्या मार्गदर्शनातून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!