*एका विवाहितेने तिच्या 3 वर्षीय मुलीसह प्रकाशा पुलावरून उडी घेत आत्महत्या केली होती,नऊ दिवसानंतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल*
सेंधवा येथे माहेर असलेल्या दिपालीचं धुळे येथील मधुकर मोरे यांच्याशी लग्न झालं. लग्नानंतर पती मधुकर मोरे आणि इतरांनी १२ फेब्रुवारी २०२० ते ऑक्टोंबर २०२४ दरम्यान दिपालीला पांढरे डाग (कोड) असल्याने शिवीगाळ करून मारहाण करत होते. तसंच टोमणे मारुन तिचा छळ करत होते. या त्रासाला कंटाळून दिपाली मोरेने चिमुकलीसह प्रकाशा येथील पुलावरून तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलं.याबाबत नऊ दिवसांनी शहादा पोलीस ठाण्यात मयत महिलेची आई सुनंदा सुखदेव ढोले यांच्या फिर्यादीवरून पती मधुकर नारायण मोरे, सुशिलाबाई कैलास मोरे, उषाबाई सुनील मोरे, आशाबाई रवी मोरे, अनिल नारायण मोरे, सुनील नारायण मोरे या सहाजणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८६, १११ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करत आहेत