शहादा येथे आदिवासी टोकरे कोळी समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

*शहादा येथे आदिवासी टोकरे कोळी समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन* *नेर-:* शहादा येथे टोकरे कोळी युवा मंच महाराष्ट्र राज्य,संचलित आयुष्याच्या जोडीदार वधू वर मेळावाचे आयोजन करण्यात येणार आहे.नंदुरबार,धुळे,जळगाव जिल्ह्यातील जमाती यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजित व संभाव्य वधु वर परिचय मेळावा येत्या जानेवारी २०२५ या महिन्यात शहादा येथे आयोजन करण्यासाठी ठरविलेले आहे.तसेच आदिवासी टोकरे जमात बांधवांचे हित लक्षात घेऊन पैसा व वेळेचे अपपव्य टाळण्यासाठी वधु / वर मेळावा घेऊन योग्य असा उपक्रम राबविण्यात येणार आहे. इच्छुक पालकांनी आपल्या मुला /मुलींचा फोटोसह व्हाट्सअप ग्रुप साठी व पुस्तकांमध्ये नोंदणी करण्यासाठी संपर्क साधून समावेश करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे .हा कार्यक्रम आपल्या स्वतःचा घरचा आहे समजून सहकार्य करण्याची तयारी करावयाची आहे. जेणेकरून एका व्यासपीठावर जमातीची माहिती या माध्यमाद्वारे मिळणार आहे. म्हणून पंचक्रोशीतील जिल्ह्यामधून हजेरी दाखवून आपली प्रार्थनीय उपस्थिती दाखवून चांगल्या कार्यक्रमाला हातभार लावण्यात यावा.जबाबदारीने लक्ष घालून व उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची रूपरेषा तारीख ,स्थळ,वेळोवेळी सूचित व अवगत करण्यात येईल.या कार्यक्रमात सर्वच जमात बांधव आयोजक आहेत. सर्वांनी आपल्या परीने समाजाच्या विकासासाठी व लोकभमुख कामासाठी ज्यांच्याकडे जसे कौशल्य (कला. उदाहरणार्थ समाजाच्या हितार्थ प्रिटिंग प्रेस,फोटोग्राफी,मंडप,स्वयंपाकी, बातमी लावणे,बायोडाटा संकलन) असे अनेकविध कामे वाटप करून,इत्यादी कामे सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी.आपणच आयोजक आहोत,आपणच समाजसेवक आहोत.या कार्यक्रमाला कोणालाही आणि कुठलेही उच्च पद नाही. सामान्य संज्ञाप्रमाणे कामे करून जमातीला दिशानिर्देश व चालना द्यावी. ही सर्व जमात बांधवांना आग्रहाची नम्रपणे विनंती आहे. तसेच टोकरे कोळी युवा मंच महाराष्ट्र राज्य संचलित,आटोकरे कोळी युवा मंच महाराष्ट्र राज्य,जिव्हाळा फाउंडेशन ग्रुप नंदुरबार,सुरत फेंन्ड सर्कल टीम,आदिवासी कोळी समाज संघ,वाल्मीक लव्य सेना महा.राज्य,वाल्यासेना ग्रुप महाराष्ट्र राज्य,अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र राज्य,समन्वय समिती महाराष्ट्र राज्य,वाल्मिकी साम्राज्य ग्रुप शहादा,मित्तल ग्रुप उबद,आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महा.राज्य,कोळी समाज बहुउद्देशीय संस्था नंदुरबार,यंदा कर्तव्य आहे वधु वर ग्रुप कुसुंबाआदिवासी टोकरे कोळी समाजाच्या सर्व संघटनांच्या पदाधिकारी यांच्याकडून वधु वर परिचय मेळाव्याचे शहादा येथे आयोजन करण्यात येणार असून टोकरे कोळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने आपल्या वर वधू परिचय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवावी असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!