*पवित्र क्षेत्राला लाचखोरीचे ग्रहण, शिक्षण विभाग कलंकित**गटशिक्षण अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात*धुळे – शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनात अमुलाग्र बदल करत असते. त्यामुळे ज्ञानदान हे महान कार्य समजले जाते. आणि त्यामुळे शिक्षण विभागाच्या आदर देखील मोठा असतो. मात्र याच शिक्षण विभागाला लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. आणि यांच्यामुळे शिक्षण विभाग देखील कलंकित झाला आहे. मागील काळात धुळे लाच लाचलुचत प्रतिबंधक विभागामार्फत शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लाच घेताना रंगेहात अटक करून कारवाई करण्यात आली होती. आता महिनाभरात पुन्हा एकदा शिक्षण विभागातील लाच मागणी प्रकरणात गटशिक्षणाधिकाऱ्याला धुळे एसीबी चे अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. एकीकडे या कारवाईचे जिल्हाभरातून कौतुक होत असताना, शिक्षण विभागात मात्र खळबळ माजली आहे.लोकसेवक महेंद्र गोपाळराव सोनवणे, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, सांकी, जि. धुळे तथा अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक व माध्यमिक), धुळे यांनी तक्रारदार यांचे कडून २,००,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती, ही गोष्ट सिद्ध झाली म्हणुन एसीपी कडून गुन्हा दाखल झाला आहे.तकारदार यांचे ओम साई इन्टरप्राइझेस या नावाचे पिंपळनेर, ता. साकी जि. धुळे येथे दुकान आहे. सदर फर्म मार्फत तक्रारदार यांनी समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत बुट व पायमोजे पुरवठा करणे बाबत जिल्हा परिषद शाळांमार्फत प्राप्त पुरवठा आदेशानुसार साकी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना अंदाजे एकुण ४०,००,०००/- रूपयांच्या बुट व पायमोजे हया वस्तु पुरवठा केल्या होत्या.सदर अनुदान मागणीच्या फाईल जमा करून मला सदर वस्तुंचे बिल मला अदा करणे लोकसेवक महेंद्र गोपाळराव सोनवणे, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, सांकी, जि. धुळे तथा अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक व माध्यमिक), धुळे यांनी बुट व पायमोजे हया वस्तुंच्या बिल मागणीचे फाईल जमा करून अंदाजे एकुण ४०,००,०००/- रूपये बिलाच्या ०५ टक्क्या प्रमाणे २,००,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दि.३०.०९.२०२४ रोजी तकार केली होती.सदर तकारीची दि.३०.०९.२०२४ रोजी व दि.०१.१०.२०२४ रोजी पडताळणी केली असता गट शिक्षण अधिकारी, महेंद्र सोनवणे यांनी तक्रारदार यांचेकडे बुट व पायमोजे हया वस्तुंचे अंदाजे एकुण ४४,००,०००/- रूपये बिलाच्या ०५ टक्क्या प्रमाणे २,००,०००/- रूपये लाचेची मागणी केली म्हणुन त्यांचे विरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.धुळे जिल्ह्यातील कोणताही लोकसेवक सरकारी काम करून घेण्यासाठी आपल्याकडून लाचेची मागणी करत असेल, तर आपण धुळे जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडे संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Related Posts
बिरसा फायटर्सच्या पाठपुराव्याला यश;वस्तीशाळा निमशिक्षकांचा प्रश्न सुटला!*बिरसा फायटर्सचे मानले आभार!*
*बिरसा फायटर्सच्या पाठपुराव्याला यश;वस्तीशाळा निमशिक्षकांचा प्रश्न सुटला!* *बिरसा फायटर्सचे मानले आभार!*नंदूरबार:वस्तीशाळा निमशिक्षकांना तात्काळ सेवेत सामावून घ्या,या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेने…
शहादा शहरातील संभाजीनगर येथील बोधिवृक्ष परिसर प्रशिक बुद्ध विहारात गुरुपौर्णिमा निमित्ताने जगद्गुरु विश्व शांतीचे मार्गदाता विश्ववंदनी महामानव गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करून बौद्ध अनुयायांनी त्रिशरण पंचशील पठण करून गुरुपौर्णिमा साजरी केली.
शहादा दि 22 .शहरातील संभाजीनगर येथील बोधिवृक्ष परिसर प्रशिक बुद्ध विहारात गुरुपौर्णिमा निमित्ताने जगद्गुरु विश्व शांतीचे मार्गदाता विश्ववंदनी महामानव गौतम…
दोंडाईचा हद्दीत पोलीसांनकडुन एक दिवसात 05 ठिकाणी गावठी दारु विक्रेत्यांवर कारवाई करुन 1,41,115/- रुपयाचा मुद्देमाल जप्त*
*धुळे-:* *दोंडाईचा हद्दीत पोलीसांनकडुन एक दिवसात 05 ठिकाणी गावठी दारु विक्रेत्यांवर कारवाई करुन 1,41,115/- रुपयाचा मुद्देमाल जप्त* धुळे तालुका प्रतिनिधी…