स्वच्छ पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापनासाठी खापर गावकऱ्यांचे गट विकास अधिकारी यांना निवेदन.मागण्या मान्य करा अन्यथा गावकरी आंदोलन करणार.

स्वच्छ पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापनासाठी खापर गावकऱ्यांचे गट विकास अधिकारी यांना निवेदन.मागण्या मान्य करा अन्यथा गावकरी आंदोलन करणार.प्रतिनिधी-खापर अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात कचरा व्यवस्थापन नसल्यामुळे दुर्गंधी पसरलेली दुर्गंधी,पाणीपुरवठा करणारी फुटलेली पाईपलाईन,घंटागाडी सुरू करणे या संदर्भात खापर येथील गाव गावकऱ्यांच्या वतीने अक्कलकुवा गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, खापर गावात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन भातीजी महाराज मंदिर हनुमान मंदिर कॉलेज शेजारी व वॉटर सप्लाय करणारी विहीर याठिकाणी फुटली असून येथे साचणाऱ्या पाण्यात जनावरे लोळतात. परिणामी तेच पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या घरापर्यंत जात आहे. तसेच गावातील बिरसा मुंडा चौक,शासकीय गोदाम, साईबाबा मंदिर परिसर,शासकीय जिनिंग प्रेस येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील शासकीय मुलींच्या वस्तीगृहासमोर असलेल्या विद्युत रोहत्रा उघळ्या अवस्थेत आहे, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचे नाकारता येत नाही व गावांत बंद असलेली घंटागाडी पुन्हा सुरू करावी अन्यथा दि.२५ नोव्हेंबर रोजी पंचायत समिती अक्कलकुवा येथे आंदोलन पुकारण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देता प्रसंगी विनोद पाडवी, बाबा पिंजारी उपस्थित होते. तर निवेदनात शिवाजी पाडवी,विनोद पाडवी,सुनील वसावे,बाबा पिंजारी,वासुदेव पाडवी,गोविंद पाडवी,रमेश वसावे,दिनकर पाडवी,रवी वसावे,सुनिल वसावे,संतोष पाडवी यांच्या सह्या आहेत.फोटो-अक्कलकुवा पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी यांना निवेदन देतांना विनोद पाडवी,बाबा पिंजारी.दुसऱ्या छायाचित्रात ठिकठिकाणी झालेला कचरा. तिसऱ्या छायाचित्रात फुटलेली पाणीपुरवठा पाईपलाईन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!