*धुळे-:* *दोंडाईचा हद्दीत पोलीसांनकडुन एक दिवसात 05 ठिकाणी गावठी दारु विक्रेत्यांवर कारवाई करुन 1,41,115/- रुपयाचा मुद्देमाल जप्त*
धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे
धुळे-: दोंडाईचा शहरात सुरु असलेले अवैध धंदे यांच्या वर वेळीच विराम लावण्यासाठी पोलीस अधिक्षक धुळे, श्रीकांत धिवरे सो, अपर पोलीस अधिक्षक, किशोरकुमार काळे , धुळे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी किशोरकुमार परदेशी साहेब यांनी दिलेल्या सुचनेनुसार त्यांचे अधिनस्त दुय्यम अधिकारी, बीट अमंलदार व शोध पथकातील अमंलदार यांचे कडुन सदर कारवाई केली.सदर कारवाई दोंडाईचा शहरातील अंजुम टॉकीज जवळ टपरीच्या आडोशाल गावठी हातभट्टीची दारु विकणारी महिला सीमा कैलास गुमाणे, मालपुर ता. शिंदखेडा जि. धुळे येथील गावठी हातभट्टीची दारु विकणारा दंगल पंडीत भिल , तावखेडा गावात गावठी हातभट्टीची दारु विकणारी इसम नामे- शामराव दंगल ठाकरे, शामा रतन सोनवणे, रज्या दंगल ठाकरे यांच्या वर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम-1949 कलम 65-ई कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकाच दिवशी 5 ठिकाणी कारवाई करुन शहरात गुन्हे दाखन करण्यात आले असुन सदर गुन्ह्यात एकुण 1,41,115/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांचा बिट हवलदार करीत आहे. पोसई नुकुल कुमावत पोलीस हवालदार गिरासे, महाजन , पोलीस कॉन्स्टेबल महेश शिंदे, निर्मल पवार, निकुंबे , यांनी घटनास्थळी दाखल होऊन ही कारवाई केली आहे.