जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने टिटवाळा येथील स्वराज रणरागिणी महिला संस्थेच्या’नवदुर्गां’चा विशेष सन्मान ———————————————————-टिटवाळा(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,स्त्री म्हणजे निरंतर साथ,रणरागिणींनो तुमच्या कार्याला सलाम!टिटवाळ्यातील या रणरागिणी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत,सर्व महिला घर संसार सांभाळून कार्यमग्न आहेत.त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल जनजागृती सेवा संस्थेने घेतली.त्या अनुषंगाने नुकताच स्वराज्य रणरागिणी महिला संस्थेतील कर्तृत्ववान महीलांना महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या योगदानाबद्दल’नवदुर्गा’या शीर्षकाखाली विशेष सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम गजानन महाराज मंदिर,गजानन हाइट्स,टिटवाळा येथील सुनिता चव्हाण यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरूवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या स्वागत भाषणाने झाली.त्यांनी महिलांच्या योगदानाची महत्वपूर्णता स्पष्ट केली आणि त्यांच्या कार्यामुळे समाजात होत असलेल्या सकारात्मक बदलांचा उल्लेख केला.कार्यक्रमात संस्कृती संवर्धन फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड.रणधीर सकपाळ,कल्याण-कसारा-कर्जत महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला संघटक सौ.आरतीताई भोईर,तसेच स्वराज्य रणरागिणी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.सुप्रिया आचरेकर यांनी सहभाग दर्शवुन उत्कृष्ट मार्गदर्शन केले.सदर सन्मानित महिलांमध्ये सुनिता चव्हाण,रेश्मा कांबळे,स्वाती गोगटे,शारदा चटर्जी,शारदा पवार,सपना पवार,अर्चना निंबाळकर,अर्चना जोशी,रंजना विश्वासराव,वैशाली मालुसरे,आणि उज्वला भोईर यांचा समावेश होता.प्रत्येक महिलेस’नवदुर्गा सन्मानपत्र’,गुलाब पुष्प व भेटवस्तू प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी महिलांनी त्यांच्या संघर्ष आणि यशाच्या कहाण्या उपस्थितांना सांगितल्या,त्यामुळे सर्व उपस्थितांना प्रेरणा मिळाली.कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी सर्व सन्मानित महिलांचे कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
Related Posts
विकास इंग्लिश मिडीयम स्कूल वडाळी ता.शहादा येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न
विकास इंग्लिश मिडीयम स्कूल वडाळी ता.शहादा येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न शैक्षणिक उपक्रमासोबत मनोरंजनाची जोड असली तर विद्यार्थी घडविण्यास…
शारदा विद्या मंदिर विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.
शारदा विद्या मंदिर विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.आज रोजी शारदा शिक्षण प्रसारक संस्था सारंगखेडा संचलित शारदा विद्या मंदिर, सारंगखेडा…
आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास लोकांपर्यंत पोहचणार-पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित.
आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास लोकांपर्यंत पोहचणार-पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित.