शहादा तालुका को ऑप. एज्यु सोसायटी संचालीत शेठ व्ही के शाह विद्या मंदिर आणि कै. जी. एफ पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांचा वतीने Sveep कार्यक्रमा अंतर्गत पत्रलेखन आणि जण जागृती रॅली आणि पथनाट्याचा उपक्रम राबविण्यात आला संकुळापासून प्राचार्य सुरेखा पाटील, उपमुख्याध्यापक सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थी विद्यार्थिनीची रॅली मार्गस्थ झाली.मतदान जागृतीच्या घोषणा देत रॅली महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे प्रांतधिकारी कार्यालयात पोहोचली. येथे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक समितीच्या वैशाली पाटील, आशा सोनावणे हेमा पाटील यांच्या मार्ग दर्शना खाली पथनाट्य सादर केले. सांस्कृतिक समितीचे विष्णू जोंधळे यांनी नागरिकांना मताधिकार न विकता त्याचा वापर करावा असे आवाहन केले.प्राचार्य सुरेखा पाटील यांनी मतदान जनजागृतीसाठी विद्यालयाच्या वतीने sveep अंतर्गत पत्रलेखन द्वारा शाळेने विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील हज्जारो पालकांचे प्रबोधन केल्याचे सांगितले. या सोबतच आज रॅली आणि पथनाट्याद्वारे जन जागृती केल्याचे सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी, आणि सांस्कृतिक समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले.
Related Posts
*पांडुरंग बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप*
*पांडुरंग बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप* ✍️✍️ शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे दि.10 रोजी जिल्हा…
शिरपूर शहरात वरवाडे येथे कानुबाई माता लग्न उत्सव चे आयोजन
शिरपूर शहरात वरवाडे येथे कानुबाई माता लग्न उत्सव शनिवार दिनांक 21 12 2014 रोजी भगत व गौळणी आगमन सायंकाळी पाच…
*महात्मा फुले।समाजकार्य महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन धवलीविहिर येथे संपन्न
*महात्मा फुले।समाजकार्य महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन धवलीविहिर येथे संपन्न**माजी सैनिक सुभाष गणपत पावरा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न* तलोदा येथील समाजकार्य…