प्रतिनिधी=नरेश शिंदे
*फटाके मुक्त दिवाळी…* जी एस विद्या मंदिर व कला विज्ञान महाविद्यालय वडाळी या शाळेत विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी व कला शिक्षिका नूतन पाटील यांच्या मार्गदर्शनाने इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करण्याच्या अभिनव उपक्रमात सहभाग नोंदवला. निवडक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात येणार आहेत. यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना मोतीचूर लाडू वाटून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. फटाक्यापासून बचत होणाऱ्या पैशांनी शैक्षणिक साहित्य, वाचनीय पुस्तक खरेदी करणे व बचत पेटीत पैसा बचत करण्याच्या मनोदय विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.”ज्या समाजात मी जन्माला आलो त्या समाजाचे काही देणे लागते!” या सामाजिक भावनेने प्रेरित होऊन काही विद्यार्थ्यांनी दिवाळीतील फराळ विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या घरी देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असे मत व्यक्त केले. तसेच कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर न करता व पर्यावरणाला धोका न पोहचवता कागदापासून स्व हाताने, सुंदर असे आकाश कंदील तयार केले आहेत व हेच आकाश कंदील आपल्या घरी लावण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध झाले. दिवाळी हा सण प्रत्येक घराघरांमध्ये आनंदोत्सव घेऊन येतो. दिवाळी सुट्टीच्या काळात नातेवाईक एक दुसऱ्याच्या घरी भेटीसाठी जात असत.परंतु अलीकडे व्हाट्सअप व मीडिया द्वारा शुभेच्छा दिल्या जातात. या कृत्रिम संस्कारावर मात करून , यावर्षी आमच्या विद्यालयातील विद्यार्थी आपले नातेवाईक ,,मित्रपरिवार यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष घरी जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत, वरील विविध समाज उद्धारक संकल्प केल्याने, विद्यालयाचे प्राचार्य संजय भोई,, पर्यवेक्षक विलास पाटील,, सर्व शिक्षक बंधू भगिनी व कार्यालयीन सहकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.