मूकबधीर , दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेत प्राणीमित्र चैताली ने केला आपला वाढदिवस साजरा

*मूकबधीर , दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेत प्राणीमित्र चैताली ने केला आपला वाढदिवस साजरा* तसे पाहिले तर सर्व लोक आपला वाढदिवस खूपच जोरदार पार्टी करून डिजे वाजऊन नाचून साजरा करतात त्यात कितीतरी पैशांचा वायफळ खर्च होत असतो परंतु नागपूर ची प्राणीमित्र ,सर्पमित्र ,वन्यजीव रक्षक,आणि मांगल्य फाउंडेशन च्या अध्यक्षा चैताली भस्मे दरवर्षी आपला वाढदिवस एखादया गरजू ,अनाथ गरीब लोकांसोबत साजरा करीत असते दर वर्षी प्रमाणे याही वर्षी चैताली ने आपला वाढदिवस छत्रपती नगर नागपूर येथील डॉ सोणुताई कर्णबधीर निवासी शाळेतील दिव्यांग मुलांसोबत केक कापून फळे तसेच खाऊ वाटून त्यांच्यासोबत त्यांच्या भाषेत बोलून सोबत वेळ घालउन साजरा केला मुलांनी पण खूप आनंदाने त्यांचे कौतुक केले यावेळी कर्णबधीर निवासी शाळेचे कर्मचारी नम्रता दुरुतकर, संतोष गीते , सुनील भोयर आदी उपस्थित होते त्याचप्रमाणे मांगल्य संस्थेचे सदस्य संचित भस्मे,अनिल देव, विजू डोंगरे आदी सदस्य उपस्थित होते कित्तेक वर्षांपासून चैताली चा हा उपक्रम सुरू आहे आजपर्यंत अनेक अनाथ महिला आश्रम , निराधार वृद्धाश्रम, ,मतिमंद मुलांची शाळा ,अनाथ मुलांचे आश्रम अशा अनेक ठिकाणी चैताली ने गरीब गरजू मुले ,महिला ,वृद्ध ,यांना केक भरउन भोजन दान करून भेटवस्तू देऊन आपला वाढदिवस साजरा केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!