शहादा एस टी आगारात नवीन आठ अत्याधुनिक बसेस दाखल

शहादा एस टी आगारात नवीन आठ अत्याधुनिक बसेस दाखल =================दीपावली पर्वाच्या मुहूर्तावर शहादा बस आगारात नवीन आठ बस दाखल झाल्याने एस टी चे अधिकारी, सर्व कर्मचारी, शहादा तालुका विश्वासू प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रवासी वर्ग यांनी आनंद व्यक्त केला आहे.आज सकाळी या नवीन बसेसचे उदघाट्न करण्यात आले या प्रसंगी आगार व्यवस्थापक हरीश भोई, सेवानिवृत्त आ गारव्यवस्थापक संजय कुलकर्णी,संतोष वाडीले, प्रवासीसंघटनेचे अध्यक्ष प्रा दत्ता वाघ, उपाध्यक्ष प्रा ज्ञानी कुळकर्णी, पवार साहेब, पाटील साहेब, नितीन कोळी, चालक, वाहक आदी उपस्थित होते.धुळे विभाग नियंत्रक विजय गिते साहेब यांनी प्रवासी संघटनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत त्याबद्दल त्यांचे प्रति आभार व्यक्त करण्यात आले.नवीन बसेस या अत्यंत आरामदायी पुश बँक सिटच्या आहेत. प्रत्येक सीट जवळ मोबाईल चार्जिंग ची सोय आहे.दीपावलीच्या विशेष पर्वात शहादा.. पुणे नॉन स्टॉप बसेस सुरु करणार आहेत.जेणेकरून प्रवाश्याना सोयीचे होईल, यात रातराणीचा समावेश असेल आणि भाडे फक्त्त ₹ 640 असणार आहे. ऍडव्हान्स बुकिंग ची व्यवस्था करण्यात आली आहे.प्रवाशांनी फोन क्र. 02565 223222 वर संपर्क किंवा आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!