*दिवाळी निम्मित शहादा शहरात भेसळ युक्त खवा व मिठाईची विक्री जोमात सुरू**भेसळ युक्त खाद्य योग्य तेलाचा अतिप्रमाणात वापर**मानवी आरोग्यास हानिकारक व धोका*
प्रतिनिधी= नरेश शिंदे
शहरात व तालुक्यात दिवाळीच्या निमित्त मिठाई चे मोठ- मोठे मॉल लागले असुन सदरची मिठाईचा खव्वा भेसळयुक्त आहे तसेच तळण्यात आलेले पदार्थ हे भेसळयुक्त खाद्य तेलामध्ये बनविल्या जात आहेत या भेसळयुक्त खाद्य तेलामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सदर खाद्य तेल हे विविध विभागातून खुल्या प्रकारे तेल शहादा शहरात व तालुक्यात येत आहे.हे तेल काळसर रंगाचे येत असुन या खाद्य तेलामुळे हृदयाचे आजार व विविध प्रकारचे आजार निर्माण होऊन आरोग्यास धोका निर्माण होत आहे.आज पर्यंत अन्न प्रशासन विभागाने या परिसरात अश्या खाद्य तेलाच्या विक्री बाबत तेलाची तपासणी केल्याचे ऐकविण्यात येत नाही.या पॉलिथीन पॅकवर कुठल्याही प्रकारचे विक्री करणाऱ्या दुकानाचे नाव अथवा पॅकिंग केल्याचा दिनांक आढळत नाही तेंव्हा सदर गंभीर बाबीकडे अन्न प्रशासन विभागांतर्गत डोळे उघडे करून तपासनी होते का? असा प्रश्न जनतेत निर्माण होत आहे, तेव्हा अशा खाद्यपदार्थाची तपासणी करण्यात यावी व जनतेच्या आरोग्यास हानी पोहोचणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी जनतेकडून मागणी होत आहे.