तिरढे तालुका पेठ जिल्हा नाशिक येथे नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांची कष्टकरी महिला, समाजातील दुर्लक्षित व गरजू शेतमजूर यांच्याबरोबर दीपावली साजरी.

तिरढे तालुका पेठ जिल्हा नाशिक येथे नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांची कष्टकरी महिला, समाजातील दुर्लक्षित व गरजू शेतमजूर यांच्याबरोबर दीपावली साजरी.. जिथे कमी तिथे आम्ही या ऊक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक या संस्थेच्या वतीने तिरढे तालुका पेठ जिल्हा नाशिक येथे एक आगळी वेगळी दिवाळी कष्टकरी महिला, समाजातील दुर्लक्षित शेतमजूर व गरजू लोकांसोबत साजरी करण्यात आली. असं म्हणतात दिवाळीच्या दिवशी केवळ घर सजवण्यासाठी दिवा लावू नका तर प्रत्येकाच्या हृदयात ज्ञान आणि प्रेरणेचा दिवा लावा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणता येईल याकरिता प्रयत्न करा. सर्वसाधारण आपण प्रत्येक जण दिवाळीला नवीन वस्त्र खरेदी करतो व आपल्या घरात दिवे व फराळ बनवतो आणि ते खातो नमस्ते नाशिक फाउंडेशन अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गरजू व कष्टकरी महिलांना शंभरहून अधिक साड्यांचे वाटप करण्यात आले. त्या साड्या घेत असताना त्या गरीब महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.दिवाळीला आपल्याला नवीन साडी परिधान करायला मिळेल याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. “एक हात माणुसकीचा” दिवाळी दुर्लक्षित लोकांबरोबर या उपक्रमांतर्गत फराळ वाटून व त्यांच्याबरोबर फराळाचा आनंद घेण्यात आला . गरजू मुलींना ड्रेस, शेतमजुरांना शर्ट पॅन्ट, लहान मुलांना मिठाई,वह्या, गावातील प्रत्येक घरात दीप उजळावा याकरिता पाण्यावर चालणाऱ्या दिव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अश्विनी पाटील, मीनाक्षी नागपुरे, दीपा भावसार, खजिनदार संदीप देव, तिरढे गावाचे माजी सरपंच सोमनाथ नाठे, चंद्रकांत नाठे, नामदेव नाठे, गावातील ज्येष्ठ नागरिक विठोबा भारुड, मुरलीधर नाठे, हरिभाऊ भारुड, हरिभाऊ वार्डे, आदी मान्यवर उपस्थित होते, दीपक अग्रवाल, अनिल नाहर, एडवोकेट प्रकाश सुराणा आदी मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!