वडगाव येथे कृषि विभागा मार्फत श्रमदानातुन वनराई बंधारा बांथण्यात आला

मौजे- वडगाव येथे कृषि विभागा मार्फत श्रमदानातुन वनराई बंधारा बांथण्यात आला वडगाव येथे उपविभागीय कृषि अधिकारी ,तालुका कृषि अधिकारी शहादा यांचे मार्गदर्शनाखाली श्रमदानातुन वनराई बंधारे बांधण्यात आले यावेळी मंडळ कृषि अधिकारी मंदाणा मनोज खैरनार यांनी कृषि विभागा मार्फत व लोकाच्या सहभागातुन श्रमदानातुन वनराई बांधण्यात आला आहे या वनराई बंधारा द्रावरे आजुबाजुच्या शेतकर्‍याना ज्यावेळी संरक्षित पाण्याची गरज पडेल त्यावेळी आजुबाजुचे शेतकरी हे पाणी लिप्ट देऊ शकतील हा हेतु आहे आणी दुसरा हेतु हे वाहणारे पाणी जमिनी जिरेल आणी मुरेल त्यामुळे आजुबाजुच्या शेतकर्‍याचे विहीरीचे पाण्याची पातळी वाढेल त्याकरीता मंदाणा मंडळात 100 वनराई बंधारे श्रमदानातुन बाधण्याचे नियोजन केल्याचे सांगितले तसेच वडगावचे कृषि सहाय्याक सुनिल सुळे यांनी यांनी पाणी आडवा पाणी जिरवा अशी घोषणा देत पावसाळा संपल्यानंतर नदी ,नाल्यामधुन वाहून जाणारे पाणी वाहून वाया न जाता ते पाणी वनराई बंधारे बाधुन अढविल्याने हे गुराना ,आजुबाजुच्या शेतकर्‍याना भाजीपाला व इतर कामासाठी उपयोगी पडेल या करीत वनराई बंधारा बांधण्यात आले वनराई बंधारा बाधण्या करीता सहकार्य कृषि पर्यवेक्षक एकनाथ सावळे ,उपसरपंच विजय सोनवणे ,वनसमिती अध्यक्ष दिलीप वळवी, माजी सरपंच रमेश जाधव ,ग्रा.प.सदस्य पवन सुळे , पोलिस पाटील ओकेश पावरा,कृषि मिञ अजित वळवी ,गोतम सुळे आदि शेतकरी व ,मंडळ कृषि अधिकारी मंदाणा सर्व कर्मचारी वृध कृषि सहाय्याक वडगाव सुनिल सुळे यांनी सिमेंटचे रिकामी गोणी आणुन ग्रामस्थाचे सहायाने वनराई बंधारा बांधण्यासाठी नियोजन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!