शिरपुर शहरातील वाल्मिक नगर परिसरात आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जयंती उत्साहात साजरी*

*शिरपुर शहरातील वाल्मिक नगर परिसरात आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जयंती उत्साहात साजरी*प्रतिनिधी गोपाल कोळी दोंडाईचा, शिरपुर येथे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त शिरपुर शहरातील वाल्मिक नगर परिसरात प्रतिमा पुजनाचे आयोजन वाल्मिक नगर परिसरातील समस्त आदिवासी कोळी जमात बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ समाजसेवक मनोहरदादा वाघ,संजय देवरे, दिनेश सोनवणे,हिरा वाकडे, रुपचंद कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जमलेल्या जमात बांधवांना जेष्ठ समाजसेवक मनोहरदादा वाघ यांनी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांनी कशा प्रकारे इंग्रज व जुलमी सावकार यांच्या विरोधात बंड पुकारत आपले जमात बांधव व आपल्या क्षेत्रातील कष्टकरी दिनदुबळया,शोषीत नागरिकांचे रक्षण केले. शेवटी फितुरीने राघोजी भांगरे यांना पकडून इंग्रज सरकारने त्यांना फासावर चढवले. तरी जमात बांधवांनी एकजुटीने आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.यावेळी प्रतिमा पुजनास प्रताप कोळी, नाना कोळी,रवि वाघ, किशोर मुडी मांडळकर, राहुल पिंप्पलेकर,सुरेश कोळी,किरण देवरे,सागर कोळी, राकेश कोळी,भटु कोळी,शेखर कोळी, अविनाश कोळी,राजु कोळी, आकाश कोळी,अजय कोळी,दिपक कोळी, जवाहरलाल कोळी, शैलेश कोळी, कैलास कोळी,गुलाब कोळी, सुरेश कोळी,महेश कोळी, योगेश कोळी व आदिवासी कोळी जमात बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!