मतदान जनजागृतीसाठी धुळे येथे जनजागृती

मतदान जनजागृतीसाठी धुळे येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजनमातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था, धुळे यांच्या पुढाकाराने व मा. अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे मॅडम, मा. शोभा बाविस्कर (उपायुक्त, मनपा, धुळे), व स्विप पथकाच्या नोडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिक्षक कालनी येथील महादेव मंदिरात मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्दिष्ट विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि नागरिकांना संविधानिक हक्क म्हणून मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी प्रेरित करणे हे होते. यावेळी उपस्थितांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले आणि प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमात अनमोल, बुद्ध भूषण, जवाहर, शिक्षक, सिंचन कालनी परिसरातील नागरिक, नवमतदार, युवती, तसेच जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!