लाडशाखीच वाणी समाज मंडळकल्याण यांच्यातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

लाडशाखीच वाणी समाज मंडळकल्याण यांच्यातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारआपल्या समाजातील विद्यार्थी ज्ञानाच्या जोरावर आपले व आपल्या कुटूंबियांचे नाव उज्वल करत असतात. हीच उज्वल यशाची पताका फडकविणारे सर्व मुले आपल्या समाजास भूषणावह आहेत. लाडशाखीय वाणी समाज मंडळ, कल्याण यांच्यातर्फे दरवर्षाप्रमाणे समाजातील गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.गुणगौरव समारंभ रविवार, दि. १०.११.२०२४ रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर शंकरराव चौक, सुभाष मैदाना जवळ, बाजार पेठ रोड, कल्याण येथे पार पडला, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे सौ. स्नेहल संदीप देव प्रसिध्द उद्योजिका व अध्यक्ष नमस्ते नाशिक फाऊंडेशन, नाशिक, यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व तीन स्क्रीन पासून लांब राहण्यासाठी सांगितले मोबाईल, मॉनिटर, व टीव्ही .विद्यार्थ्यांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनोद मुरलीधर कोतकर (स्त्रीरोग प्रमुती शास्व तज्ञ, आई हॉस्पिटल, चाळीसगाव) अध्यक्ष: आई फाऊंडेशन यांनी सुद्धा प्रेक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेश्री. नरेंद्र बाबुराव पवारमाजी आमदार १३८ कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतेयाप्रसंगी लाडशाखी वणी समाज मंडळ कल्याण यांचे अध्यक्ष श्री. सी. डी. येवले, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र एन. पाखले , सचिव श्री. बी. पी. नावरकर, उपाध्यक्ष श्री. उमाकांत एन. कुडे खजिनदार श्री. रामकृष्ण एन. मराठे व सर्व कार्यकारिणी सदस्य लाडशाखीय वाणी समाज मंडळ, कल्याण आधी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!