आण्णा कोळी महादेवपुरा दोडाईंचा
*विखरण गावातील श्री व्दारकाधिश महाराजांच्या यात्राउत्सव काळात मंगळसूत्र चोरी, अवैध दारूविक्री आणि जुगार ला स्थानिक पोलीस प्रशासनाचा अभय*.देवाचा दारातही सर्व सामान्य नागरिक सुरक्षित नाही नियमानुसार कार्तिकी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रात ड्रा डे असतो तरीही विखरण येथील मद्य सम्राटांची कायद्याला लाथळून उघडयावर मद्य विक्री सुरूयात्रेत सुसाट वेगाने चाललेल्या अवैध दारू विक्री व जुगार सर्रासपणे चालतांना दिसून आल्याने विखरण गावाचे पोलीस पाटील व स्थानिक पोलीसांचे अभय प्राप्त आहे काय ? असा प्रश्न यात्रेत येणाऱ्या भाविकांकडून उपस्थित केला जात आहे विखरण गावात दिनांक 12/11/2024 ते 15/11/2024 या कालावधीत साजरा होणार यात्राउत्सवाच्या पहिल्याच दिवशी 12 ते 15 महिलांचे मंगळसुत्र चोरी झालेले असून अवैध दारू विक्री आणि जुगार सर्रासपणे चालतांना दिसून आल्याने या सगळ्यात अवैध धंद्याना स्थानिक पोलीस प्रशासनाकडून अभय प्राप्त आहे काय? असा प्रश्न यात्रेत येणाऱ्या भाविकांकडून उपस्थित केला जात आहे. विखरण गावातील श्री द्वारकाधीश महाराजांच्या तीन दिवशीय यात्रा उत्सवाला आज पासून प्रारंभ झाला पहिल्याच दिवशी पोलीस प्रशासनचा ढिसाळ कारभार पहावयास मिळाला वाहतूकीचे योग्य नियोजन न केल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झालेली होती यात्रेचा पहिल्याच दिवशी दहा ते बारा महिलांचे मंगळसूत्र चोरी झाले अवैध मद्य विक्री तर उघड्यावर सुरू होती यात्रेत गैरप्रकार टाळण्यासाठी व यात्रेमध्ये अवैध धंदे चालकासोबत जागा मालकांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी बाहेर गावातील आलेल्या भाविकांनी केली