शिक्षण,सिंचन ,आरोग्य व मुलभुत सुविधांचा विकास कधी होईल अपक्ष उमेदवार शामकांत सनेर*

*शिक्षण,सिंचन ,आरोग्य व मुलभुत सुविधांचा विकास कधी होईल अपक्ष उमेदवार शामकांत सनेर*मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी मालपुर, शिंदखेडा विधानसभा मतदार संघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात शामकांत सनेर यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने तिहेरी लढत पहायला मिळत आहे. शामकांत सनेर यांनी तालुका पिंजून काढतानाच प्रचार रॅलीचा धडाका लावला आहे. या दरम्यान ते मतदारांशी संवादही साधत आहेत. त्यांना जनतेतून उत्स्फुर्त पाठींबा मिळत आहे. गावातील वयोवृद्ध नागरिकांचे चरणस्पर्श करीत सनेर यांनीआशिर्वाद घेतले. यावेळी शामकांत सनेर म्हणाले की, शिंदखेडा तालुक्यात बारा बलुतेदारात मोडणाऱ्या अठरा पगड जाती विसावल्या आहेत. धर्म निरपेक्षतेच्या भावनेतून मी अनेक वर्ष काम करीत आहे. पण, त्याचवेळीशिंदखेडा तालुक्यात जात धर्माचा पुरस्कार करणारे राजकारण करतांना जाती-जातीत भांडणे लावत आहेत. केवळ निवडणुकी पुरता शिंदखेड्यात वावरणारे धर्म निरपेक्षतेचा वाव आणतात. प्रत्यक्षात ते देखील जातीधर्माचा भेद करतात. विस्तीर्ण पात्र असलेल्या तापीच्या काठावरील शिंदखेडा तालुका अनेक वर्ष दुष्काळी राहिला. त्याला जात देईल असा जबाबदार आहेत. शिंदखेड्यात सिंचन, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य, शेती मालाचा दर हे मुलभूत प्रश्न आहेत. पण हे प्रश्न सोडविण्या ऐवजी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी जाती-जातीत भेद निर्माण केले. गावागावात भांडणे निर्माण करून अस्वस्थ वातावरण तयारकेले. भांडणे, पोलिसांत गुन्हे दाखल करणे, पोलिस ठाण्याच्या चकरामारणे अशा कामांमध्ये तरुणांना गुंतवुन ठेवले. सलग चारवेळा आमदार असणाऱ्यांनी तालुक्याचे प्रश्न का सोडविले नाहीत.असे गावा गावात विचारले आहे. त्याची उत्तरे ते देवू शकत नाही. दुसरीकडे मी माघार घेईल आणि त्यांना पाठींबा देईल असे आघाडीच्या उमेदवाराला वाटत होते. आघाडीच्या उमेदवाराने विचार करणे याच ठिकाणी त्यांनी त्यांचा पराभव मान्य करुन घेतला आहे. तालुक्यातील गावागावांमध्ये ज्या पध्दतीने मलाप्रतिसाद मिळत आहे तो पाहता प्रस्तापित देखील भेदरले आहेत. त्यामुळे माझ्याबाबत ते केवळ अपप्रचार करत आहेत. सिंचन, बेरोजगार या प्रश्नावर विरोधकांनी बोलणे टाळले आहे, असेही सनेर यावेळी म्हणाले.हेमांगी ताई सनेर, माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील, ॲड .एकनाथ भावसार, रामी गावाचे माजी सरपंच बापु महाजन, माजी पं. स. उपसभापती प्रकाश पाटील, कर्ले गावाचे निंबा दाजी,माजी जि. प. सदस्य धर्मा सोनवणे, धमाणे गावाचे जिजाबराव पाटील, पं. स. सदस्य राजेंद्र देवरे, चिमठाणे गावाचे माजी उपसरपंच नरेंद्र पाटील, निमगुळ गावाचे माजी सरपंच आशिष बागल, रमेश माळी , दादाभाई कापुरे आदि सह मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!